संस्कृती की विकृती

दत्तात्रय गुरव
Monday, 1 April 2019

शरीरापेक्षा मनावर झालेल्या बलात्काराच्या खुणा.
पायाच्या बोटात असणाऱ्या जोडव्यांनी तसंच दबून 
जगायचं असतं पायाखाली.

तिने त्याचा तिच्या देहावरचा हात
अलगद बाजूला सारला ती कण्हत उठली.
अजूनही रात्रभर झालेल्या व्यभिचाराच्या खुणा...
तिच्या देहावर स्पष्ट दिसत होत्या.साडी,
ब्लाउज यांच्या वरही कधी बलात्कार होतो?
हे सांगूनही पटलं नसतं कोणाला.
तिच्या देहाचा चोळामोळा करून...
तो निर्धास्त झोपला होता दारू पिऊन.
खरंतर त्याला भडवा म्हणायला हवं.
पण तिच्या कपाळाचं कुंकू...
आणि गळ्यातलं काळं मनी..
अजूनही गुलामगिरी पत्करतात तेंव्हा....
रात्रभर करकरणार्या खाटेनं...
कुरकुरायचं नसतं कधीच.
हातातल्या हिरव्याकंच काकणांनी...
ओरड करायची नसते.
आणि जगाला दाखवायचं हि नसतं...
शरीरापेक्षा मनावर झालेल्या बलात्काराच्या खुणा.
पायाच्या बोटात असणाऱ्या जोडव्यांनी तसंच दबून 
जगायचं असतं पायाखाली.
ओठांनी तक्रार नाही करायची...
ओठांनी ओठातच दाबलेल्या त्या हुंदक्यांची.
तुला स्त्री म्हणू कि देवी म्हणू गं....?
५०००वर्षानंतर आजच्या द्रौपदीला न्याय मिळालाय.
घे आनंद साजरा करून.
हो हो मान्य आहे सगळे सेक्सच करतात.
पण दाखवत नाहीत कधीच...
आपल्या आत लपलेला तो असुरी आनंद.
काहीही असो...पण एक मात्र खरं.
देश बदलतोय...
नक्कीच बदलतोय.
तेंव्हा संस्कृतीच्या नावाखाली खोट्या बोंबा मारणाऱ्यांनो...
आपली शेपूट नीट करायचं बघा आधी.
हजार लफडी करायला चालतं ना तुम्हाला?
मग तिनं केलं तर वाईट काय?
स्त्री मुक्त होतेय म्हणून....
काळजी वाटते का?
कि राग येतोय आपल्याच पुरुषी पणाचा?

पती म्हणजे मालक नाही.
विवाहबाह्य संबंध गुन्हा नाही.आणि....
कलम ४९७ रद्द झालं म्हणून...
चौकात टायर सारखं पेटायचं नसतं कधीच.कारण... 
स्त्री हि एक माणूस आहे.
तिच्याही काही गरजा....
तिच्याही काही ईच्छा आहेत.
हे अजूनही कळलेलं नाही आपल्याला.कारण....
प्रेम आणि वासना यातला फरक...
अजून कुठे कळलाय माझ्या या धार्मिक देशाला?
माझा देश अजूनही मानसिक गुलामगिरीतच आहे.
ज्यादिवशी हि गुलामगिरी कळेल ना...
त्या दिवशी भारत मुक्त असेल...
खरंच मुक्त असेल.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News