नेते गजाआड, पैसे वाटप करताना कार्यकर्ते अटक

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 21 October 2019
  • विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मतदारांना पैसे वाटप करणाऱ्या दोघा कार्यकर्त्यांना जेल रोड पोलिसांनी रविवारी सायंकाळी ताब्यात घेतले.

सोलापूर  : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मतदारांना पैसे वाटप करणाऱ्या दोघा कार्यकर्त्यांना जेल रोड पोलिसांनी रविवारी सायंकाळी ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यात आलेले कार्यकर्ते कोणत्या पक्षाचे आहेत याची चौकशी सुरू असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी सांगितले. दोघांकडून 17 हजार सातशे रुपये जप्त केले आहेत. 

साहेरा सज्जाद भागानगरी (वय 42, रा. शास्त्रीनगर, अन्सारी चौक, सोलापूर), महागामी शोएब अनिसूरहमान (वय 30, रा. मुस्लिम पाच्छा पेठ, सोलापूर) अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत. किडवाई चौक परिसरात पैसे वाटप होत असल्याची माहिती नागरिकांनी कळविल्यानंतर जेल रोड पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने धाव घेतली. नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार किडवाई चौक परिसरात साहेरा आणि महागामी हे दोघे घराघरात जाऊन पैसे वाटप करत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी दोघांना हटकले. त्यावेळी त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. 

साहेरा आणि महागामी या कार्यकर्त्यांकडून 17 हजार 700 रुपये जप्त करण्यात आले आहेत. ताब्यात घेण्यात आलेले कार्यकर्ते कोणत्या पक्षाचे आहेत, कोणाच्या सांगण्यावरून पैसे वाटप केले जात होते याची चौकशी सुरू असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी सांगितले. जेलरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जे.एन.मोगल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पवार, गुन्हे प्रकटीकरण पथकातील दीपक नारायणकर, चिंटू चमके, वसीमा बिराजदार, गवसाने यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News