फार्मसी कॉलेज देगांव येथे मतदार जनजागृती कार्यक्रम 

रुपेश बाजड, रिसोड
Wednesday, 16 October 2019
  • महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतदान व्हावे व ग्रामीण भागात मतदार जनजागृती व्हावी या करिता या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

रिसोड - महिला उत्कर्ष प्रतिष्ठानच्या अध्यक्ष मा. खासदार भावनाताई गवळी, मा. साधनाताई गवळी, मा. जितेंद्र पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली १५ ऑक्टोबर २०१९ रोजी कॉलेज ऑफ फार्मसी पुंडलिक नगर, देगांव येथे मतदार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतदान व्हावे, या उद्देशाने व ग्रामीण भागात मतदार जनजागृती व्हावी या करिता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

लोकांशीचा उत्सव समाजल्या जाणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी २१ ऑक्टोबर रोजी मतदान करण्याचे आवाहन ग्रामीण भागातील जनतेला, विद्यार्थ्यांना तसेच कॉलेजमधील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांना करण्यात आले. कॉलेज विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात आले की आपल्या गावातील जनतेला मतदानाचे महत्त्व पटवून द्या आणि प्रौढ मातधारकांना मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी 'आपले मत आपला अधिकार' तसेच 'एक मत अमूल्य मत' या  बोध वाक्याद्वारे प्रोत्साहित करण्यात आले.

या कार्यक्रमाला डॉ. विजयकुमार काळे, प्रा. युवराज पांढरे,  प्रा. शिवाजी सावके, प्रा. संदीप वाठोरे, प्रा. पारस पोफाळकर, प्रा. विशाखा बोरकर, तसेच राष्ट्रीय सेवा योजनाचे प्रा. राजनंदिनी सुरोशे, (महिला कार्यक्रम अधिकारी), प्रा. चेतन कदम (कार्यक्रम अधिकारी) तसेच रासेयोचे सर्व स्वयंसेवक विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. विजयकुमार हुक्केरी तसेच डॉ. सुनील क्षिरसागर यांचे मोलाचे योगदान लाभले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News