इथे मतदान करा; फ्रीमध्ये मिसळ खा..!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 22 April 2019

पुणे - नागरिकांनी मतदान करावे म्हणून शहरातील हॉटेल व्यावसायिक आणि काही संघटनांनी पुढाकार घेतला आहे. मयूर कॉलनीमधील एका हॉटेलमध्ये मतदान करणाऱ्यांना एका मिसळवर एक मिसळ मोफत दिली जाणार आहे.

बिबवेवाडी येथील एका हॉटेलात काही खाद्यपदार्थांवर ५० टक्के सवलत मिळणार आहे. मतदान केल्याची शाई दाखविल्यास मोफत आरोग्य तपासणी केली जाणार आहे. मयूर कॉलनीमधील जोग शाळेजवळील कडक मिसळमध्ये एकावर एक मिसळ फ्री अशी ऑफर मतदारांना देण्यात येणार आहे.

बिबवेवाडीमधील दामोदर पी ३० या हॉटेलमध्ये उपीठ आणि पोहे खाणाऱ्यांना ५० टक्के सवलत देणार आहे, अशी माहिती हॉटेलचालक आलोक ठकार यांनी दिली. आरोग्याची काळजी असणाऱ्यांनादेखील मतदान करणे फायद्याचे ठरणार आहे. गोखलेनगरमधील आकांक्षा फाउंडेशन मतदारांची मोफत आरोग्य तपासणी करून देणार आहे. गोखलेनगरमधील वैष्णवी डायग्नॉस्टिक सेंटरमध्ये २३ एप्रिल रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ पर्यंत तपासणी करता येणार आहे, अशी माहिती फाउंडेशनच्या डॉ. अपर्णा गोसावी आणि डॉ. आकांक्षा गोसावी यांनी दिली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News