विवेकानंद एड्युकेशन सोसायटी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आदिवासी महिलांना दिला मदतीचा आधार

सिद्धी गायकवाड
Sunday, 18 August 2019

रक्षाबंधन हा भावाबहिणी मधील प्रेम साजरा करण्याचा सण. ज्या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखीचा रेशीम धागा बांधते आणि भावाकडून स्वतःच्या रक्षणाचे वचन घेते. किती सुंदर असतो ना हा दिवस, पण जर हीच राखी कुण्या गरजूच्या सहाऱ्याचा भाग बनली तर.

रक्षाबंधन हा भावाबहिणी मधील प्रेम साजरा करण्याचा सण. ज्या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखीचा रेशीम धागा बांधते आणि भावाकडून स्वतःच्या रक्षणाचे वचन घेते. किती सुंदर असतो ना हा दिवस, पण जर हीच राखी कुण्या गरजूच्या सहाऱ्याचा भाग बनली तर.

चेंबूरमधील विवेकानंद एड्युकेशन सोसायटी कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्सच्या एन.एस.एस. संघाने पालघर येथील आदिवासी महिलांनी स्व-मेहनतीने बांबूच्या लाकडापासून बनवलेल्या राख्या विकून त्यांना आर्थिक उभारणी करवून देण्याचा छोटासा प्रयत्न केला. 

या उपक्रमाला सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सगळ्यांनीच भरभरून प्रतिसाद दिला. 

एन.एस.एस. स्वयं-सेवकांनी पालघर येथील आदिवासी महिलांनी बनवलेल्या राख्या प्रत्येकी 25 रुपये प्रमाणे 150 राख्या विकल्या आणि त्यातून मिळालेल्या पैशांनी आदिवासी महिलांना मदत केली. 

आदिवासी महिलांना उत्पन्नपुरावण्यासाठीचा हा छोटासा प्रयत्न होता. एन.एस.एस.च्या प्रोग्राम ऑफिसर सौ. सुनीता चौधरी व कार्यक्रमाच्या निरीक्षिका सौ. अनुसया मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम अत्यंत यशस्वीरित्या पार पडला.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News