आयुधनिर्माणी परिसरात वाघाचे दर्शन; सोशल मिडीयावर फोटो व्हायरल

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 1 August 2019

भद्रावती: व्याघ्रदिनाच्या पूर्वसंध्येला भद्रावती आयुध निर्माणी परिसरात वाघाने दर्शन दिले. यामुळे परिसरातील वन्यप्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे. दिसलेल्या या वाघाचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करीत वन्यप्राण्यांनी आपला आनंद साजरा केला. व्याघ्रदिनी योगायोगाने वाघाने दर्शन दिल्याने विविध कॉमेन्टसह दिवसभर याची चर्चा शहरात होती.

रिमझिम पावसात २८ जुलै रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास निर्माणी वसाहतीतील निर्माणीचा मुख्य गेट ते गेट नंबर दोनच्या दरम्यान असलेल्या महावितरण कंपनीच्या आवारात वाघ दिसून आला. यावेळी येथून ये-जा करणा-या नागरिकांनी वाघ दिसला. यातील अनेक हौशी नागरिकांनी आपल्या मोबाईलच्या मदतीने या वाघाचे फोटो काढले. 

निर्माणीच्या या परिसरात घनदाट जंगल आहे. या ठिकाणापासून निर्माणीची वसाहतदेखील बरीच दूर आहे. त्यामुळे या परिसरात नेहमीच शुकशुकाट असतो. त्यामुळे या परिसरात नेहमीच वन्यप्राण्यांचे दर्शन होते. ताडोबा अभयारण्याला लागून असलेल्या निर्माणीच्या जंगलात वाघ, बिबट, अस्वल यासह अन्य प्राणी आढळून येतात. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News