विराट कोहली हा क्रिकेटचा येशु ख्रिस्त - ग्रॅम स्वान

जयेश सावंत (यिनबझ)
Wednesday, 26 June 2019

विराट कोहली हा उत्तम कर्णधार असून तो आधुनिक युगातील येशू आहे, असे मत इंग्लंडचा माजी फिरकीपटू ग्रॅम स्वान याने व्यक्त केले आहे.

इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या विश्वचषक स्पर्धेच्या आता शेवटच्या टप्प्यात टीम इंडिया खेळनार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने आतापर्यंत स्पर्धेत ५ सामने खेळले, त्यातील १ सामना पावसामुळे रद्द झाला; पण इतर चारही सामन्यात भारताने प्रतिस्पर्ध्यांना चारीमुंड्या चीत केले. भारताचे सध्या ५ सामन्यात ९ गुण आहेत आणि उपांत्य फेरीच्या पायरीवर भारतीय संघ उभा आहे, म्हणूनच विराट कोहली हा उत्तम कर्णधार असून तो आधुनिक युगातील येशू आहे, असे मत इंग्लंडचा माजी फिरकीपटू ग्रॅम स्वान याने व्यक्त केले आहे.

“बाद झाल्यावर जो फलंदाज मैदानातून बाहेर जायला तयार नसतो, तो फलंदाज मला अजिबात आवडत नाही. मी अनेकदा या विषयावर फलंदाजांशी चर्चा केली आहे. मैदानावरील पंचांनी तुम्हाला बाद घोषित करेपर्यंत तुम्ही मैदानात उभे राहायला हवे. खेळाडू बाद आहे की नाही हे सांगणे पंचाचे कर्तव्य आहे, असे अनेक फलंदाजांचे म्हणणे असल्याचे दिसते. जर तुमच्या बॅटला लागून चेंडूचा झेल घेतला आणि तुम्हालादेखील ती गोष्ट माहिती आहे, तरीदेखील तुम्ही मैदानातच उभे आहात, यावर विचारल्यावर मी पंचांच्या निर्णयाची वाट पाहत होतो, असे तुम्ही म्हणतात, तर ती शुद्ध फसवणूक आहे. त्यामुळे माझ्यामते तुम्ही स्वतःला फसवत आहात असे मत स्वान याने मांडले.

पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने पंचांनी बाद घोषित करण्याआधीच मैदान सोडले. त्याला तंबूत परतल्यावर समजले की चेंडू बॅटला लागलाच नव्हता. बाद नसतानाही तो मैदानातून बाहेर निघून गेला, त्याने स्वतःलाच बाद ठरवले आणि तो माघारी परतला. त्यामुळे विराट हा आधुनिक काळातील येशू आहे, असे तो म्हणाला.

नक्की काय घडले होते?
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात मोहम्मद आमिरच्या गोलंदाजीवर विराट कोहली ७७ धावांवर खेळत होता, त्यावेळी आमिरने १ बाऊन्सर चेंडू फेकला. त्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या उद्देशाने विराटने बॅट फिरवली; पण त्याचा फटका फसला. त्यानंतर पाकिस्तानच्या संघाने अपिल केले. यात महत्वाचे म्हणजे पंचांनी त्याला बाद ठरवण्याच्या आधीच तो माघारी परतला. याहून आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे स्निको मीटरमध्ये चेंडू विराटच्या बॅटला स्पर्श न करता गेल्याचे दिसून आले. ड्रेसिंग रूममध्ये गेल्यावर विराटला त्याची चूक लक्षात आली आणि त्याने पश्चात्ताप केला. परंतु भारताने ८९ धावांनी या सामन्यात विजय मिळवला.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News