बंगाल मध्ये ममतांमुळेच हिंसाचार, त्यांच्या भाषणांनीं आगीत तेल ओतले : मुकुल रॉय

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 12 June 2019

संदेशखाली (पश्‍चिम बंगाल) : संदेशखाली येथील हिंसाचाराबद्दल मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना दोष देत भाजपचे नेते मुकुल रॉय यांनी त्यांच्यावर टीका केली. ‘‘ममता बॅनर्जी यांच्या भाषणांनी आगीत तेल ओतण्याचे काम केले असून त्यामुळेच भाजपच्या समर्थकांवर हल्ले झाले, असा आरोप रॉय यांनी केला.

संदेशखाली येथे झालेल्या हिंसाचारात भाजप समर्थक प्रदीप मंडल आणि सुकांता मंडल यांचा मृत्यू झाला. भांगपाडा गावात त्यांच्या कुटुंबाची भेट घेऊन रॉय यांनी त्यांचे सांत्वन केले. हिंसाचारातील बळींच्या वारसांना आवश्‍यक ती सर्व मदत देण्याची विनंती भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

‘‘या घटनेला कोणी जबाबदार असेल तर त्या ममता बॅनर्जी आहेत. त्यांच्याच आदेशामुळे यातील मृत्यूप्रकरणी अद्याप कोणालाही अटक झालेली नाही,’’ अशी टीका रॉय यांनी केली. 
 
Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News