विनाइंजिन रेल्वे पळाली 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 27 July 2019

चंद्रपूर: 22 डबे सोडून केवळ 3 डब्यांसह इंजिन पळाल्याची घटना वरोरा रेल्वे स्टोशन जवळ घडली. तब्बल चार तासानंतर हे इंजिन परत आलं आणि गाडी पुढच्या प्रवासाला निघाली. श्वास रोखून धरलेल्या प्रवाशांनी अखेर अटकेचा निःश्वास सोडला. 

पाटणा-बंगळुरू संघमित्रा एक्स्प्रेस काल नागपूर येथुन रात्री 6.30 वाजता निघाली. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोराजवळ रात्री 8.00 वाजताच्या सुमारास पोचताच डब्याना जोडणारं कापलिंग तुटलं. त्यामुळं 24 डब्यांच्या गाडीचे तीन डबे इंजिनला चिकटून राहिले, तर 21 डबे मागे पडले. 

मिळालेल्या माहितीनुसार यावेळी ही गाडी ताशी 100-120 किलोमीटर वेगानं धावत होती. डबे वेगळे झाल्यानंतर विनाइंजिन 21 डबे दोन ते तीन किलोमीटर धावत राहिले. यावेळी हे डबे अनियंत्रित होऊन रुळाखाली घसरू शकले असते. मात्र सुदैवानं असं काही झालं नाही. या प्रकारामुळं प्रवाशांत एकच खळबळ उडाली. पुढे गेलेलं इंजिन पाच किलोमीटर पुढे निघून गेल्यावर चालकाला हा प्रकार लक्षात आला. 

शेवटी रेल्वे अधिकाऱ्यांना हा प्रकार माहीत झाल्यावर गतिमान हालचाली करीत दुसरं इंजिन 21 डब्याना जोडून गाडी वरोरा स्थानकावर लावण्यात आली आणि पुढे गेलेलं इंजिन परत आणून तब्बल 3 तासांनी गाडी बंगळुरूच्या दिशेनं रवाना करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश रेल्वे प्रशासनानं दिले आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News