विनोद तावडे म्हणजे वरातीच्या मागून घोडे? आता सांगतात की आरक्षण वैधच

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 27 June 2019

सरकारने आणि मागासवर्गिय आयोगाने मोठ्या मेहनतीने मराठा आरक्षणाचा अहवाल सादर केला, मात्र त्याच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली, तरीही आज लागणाऱ्या न्यायालयीन निकालामध्ये न्याय मराठा समाजाच्या बाजूने लागणार असल्याचा दावा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केला आहे.

26 मार्च रोजी सादर केलेल्या सर्व यूक्ती वादानंतर न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला होता, त्यानंतर मराठा आरक्षणाच्या विरोधात चार तर समर्थनात दोन याचिका दाखल करण्यात आला होत्या, तर या निकालात हस्तक्षेप करणारे 22 हस्तक्षेप अर्ज दाखल करण्यात आले होते. 

एवढे दिवस निकाल राखून ठेवला असताना निवडणूकांच्या तोंडावर विनोद तावडेंना जाग आली का? असा प्रश्न मराठा समन्वयकांकडून विचारला जात आहे. 58 मोर्चे निघाले, 42 मराठा कार्यकर्त्यांनी आत्महत्या केल्या, त्यावेळेस मराठा समाजातल्या तरुणांना सावरायची वेळ होती किंवा त्यांच्यासोबत आवाज उठवण्याची गरज होती, मात्र तसे न करता आता मराठा समाजाने लढलेल्या लढाईत हात धूण्याचं काम आता विनोद तावडे करत असल्याचे मराठा समाजातील कार्यकर्त्यांकडून म्हटले जात आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News