व्यंकय्या नायडूंच्या खासदारांना कानपिचक्‍या, वाचा सविस्तर वृत्त

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 22 June 2019
  • वेंकय्या नायडू यांच्या कानपिचक्या 
  • सततच्या गदारोळावर अक्‍सिर इलाज करण्याचेही सूतोवाच​

नवी दिल्ली : ‘आम्ही (राज्यसभा) वरिष्ठ सभागृह आहोत त्यामुळे आमची संसदीय जबाबदारीही जास्त आहे. मात्र वारंवार गोंधळ घालून कामकाज बंद पडत असल्याने आम्ही संसद सदस्याची जाबबादारी पार पाडत आहोत का, याअनुषंगाने सर्वच पक्षांच्या सदस्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे,’ अशी भावना मांडून उपराष्ट्रपती व राज्यसभाध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू यांनी गोंधळी खासदारांना आज चांगल्याच कानपिचक्‍या दिल्या. राज्यसभेच्या नियमावलीत बदल करण्याबाबतच्या समितीचा अहवाल आपण सर्वपक्षीय नेत्यांना विचारार्थ धाडलेला आहे असे सांगून त्यांनी सततच्या गदारोळावर अक्‍सिर इलाज करण्याचेही सूतोवाच केले.

मुख्यतः गोंधळाला वेसण घालण्यासाठी नायडू यांनी नेमलेल्या राज्यसभा समितीने आपला अहवाल त्यांना सादर केला आहे. या ३८७ पानी अहवालात सध्याच्या ७७ नियमांत मूलभूत बदल बदल करण्याची व १२४ नवे नियम समाविष्ट करण्याची शिफारस केल्याची माहिती ‘सकाळ’ला समजली आहे.

यंदा पूर्ण अलिप्त होतो...’
उपराष्ट्रपतिपदी निवड होईपर्यंत सक्रिय राजकारणात असलेल्या नायडू हे राजकारणापासून दूर गेल्याची भावना वरचेवर बोलून दाखवतात. त्यांनी आजही हसतहसत सांगितले की, लोकसभा निवडणूक नुकतीच झाली. मी तब्बल ४२ वर्षांनंतर ‘इलेक्‍शन-सिलेक्‍शन-कलेक्‍शन’ व सक्रिय प्रचारापासून यंदा पूर्ण अलिप्त होतो. त्यांच्या या टिप्पणीवर काँग्रेससह विरोधी पक्षांच्या बाकांवर हास्याचे फवारे उडाले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News