काँग्रेस नेत्यांना मुले पळवणारी टोळी समजून गावकऱ्यांनी दिला बेदम चोप

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 27 July 2019

मध्य प्रदेशातल्या बैतुल शहरापासून 35 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या नवल सिंघाना गावामध्ये मुले पळवून नेणारी टोळी असल्याच्या कारणावरून तिघा काँग्रेस कार्यकर्त्यांना बेदम चोप दिला असल्याची घटना काल शुक्रवारी रात्री घडली.

बैतुल - मध्य प्रदेशातल्या बैतुल शहरापासून 35 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या नवल सिंघाना गावामध्ये मुले पळवून नेणारी टोळी असल्याच्या कारणावरून तिघा काँग्रेस कार्यकर्त्यांना बेदम चोप दिला असल्याची घटना काल शुक्रवारी रात्री घडली. त्यात बैतुल काँग्रेसचे सरचिटणीस धर्मेंद्र शुक्ला, स्थानिक काँग्रेस नेते धरमूसिंह लांजीवार आणि स्थानिक आदिवासी नेते ललित बरास्कर अशा तिघांचा समावेश आहे.

याठिकाणी गेले काही दिवस मुले पळवून नेणारी टोली आजूबाजूच्या परिसरात वावरत असल्याची अफवा पसरली आहे. त्यातच शाहपूर ते केसियादरम्यान मध्य रात्रीचा प्रवास करत असताना संबंधीत गावकऱ्यांकडून हे तिघे प्रवास करत असणाऱ्या गाडीच्या समोर झाडांच्या फांद्या टाकून गाडीला आडवण्यात आलं. कोणतीही चेहरा ओळख नसणाऱ्या या तिघांना गाडीच्या बाहेर काढून बेदम मारहाण करण्यात आली, नंतर ओळखीच्या नागरिकांकडून ओळख पटल्यानंतर त्यातील दोघांपैकी एक बैतुल काँग्रेसचे सरचिटणीस धर्मेंद्र शुक्ला तर दुसरे स्थानिक काँग्रेस नेते धरमूसिंह लांजीवार आणि तिसरी व्यक्ती म्हणजे स्थानिक आदिवासी नेते ललित बरास्कर असल्याचे उघड झाले.

या घटनेत तिघेजण जखमी असून गाडीची मोठयाप्रमाणात तोडफड करण्यात आली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News