सरकार आणि बँकांबद्दल विजय मल्ल्याचे ट्विट; पाहा काय म्हणाला..

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 31 July 2019
  • गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या सीसीडी (कॅफे कॉफी डे) चे संस्थापक व्ही. जी. सिद्धार्थ यांचा मृतदेह बुधवारी सकाळी नेत्रावती नदीमध्ये सापडला.
  • एकूणच आर्थिक अडचणींमुळे त्यांनी आत्महत्या केल्याचं पहायला मिळत आहे.

मद्यसम्राट विजय मल्ल्या याने सरकार आणि बँकांवर पुन्हा एकदा तोफ डागली आहे. सरकारी यंत्रणा आणि बँका कोणालाही आयुष्यातून उठवू शकतात, असं ट्विट त्याने केलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या सीसीडी (कॅफे कॉफी डे)चे संस्थापक व्ही. जी. सिद्धार्थ यांचा मृतदेह बुधवारी सकाळी नेत्रावती नदीमध्ये सापडला. एकूणच आर्थिक अडचणींमुळे त्यांनी आत्महत्या केल्याचं पहायला मिळत आहे. याबाबत अजून स्पष्ट कारण समोर आले नसून या बातमीने मात्र सर्वत्र खळबळ उडाली आहे. विजय मल्ल्या यांनी देखील बुधवारी केलेल्या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी सरकारवर टीका केली.

 

आपल्या ट्विटमध्ये विजय मल्ल्या याने सांगितले की, सिद्धार्थ यांना मी खूप चांगला ओळखत होतो. एक चांगला माणूस आणि अत्यंत हुशार उद्योगपती. त्यांनी लिहिलेल्या पत्रातील मजकूर वाचून मी अस्वस्थ झालो आहे. सरकारी यंत्रणा आणि बँका कोणालाही आयुष्यातून उठवू शकतात. हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. ते माझ्याशी कसे वागताहेत हेच बघा ना. मी सर्व पैसे परत करण्यास तयार आहे. तरीही मला सूडबुद्धीने वागणूक दिली जाते आहे. 

 

विजय मल्ल्या याने बँकांचे तब्ब्ल  ९ हजार कोटींचे कर्ज बुडवले आहे. तसेच तो देशाबाहेर पसार झाला आहे.  सध्या विजय मल्ल्या हा इंग्लडमध्ये रहायला आहे.  भारताकडे परतण्यासाठी तेथील न्यायालयात खटला सुरु आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News