विधान सभेसाठी मनसे अजूनसुध्दा चंचलच...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 3 June 2019
  • स्वबळावर की आघाडीसोबत; मनसेची भूमिका अनिश्‍चित

पुणे - विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवायची की राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीसोबत, याचा निर्णय अद्याप झाला नाही, असे स्पष्टीकरण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज करण्यात आले.  

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा राज्यव्यापी दौरा सुरू झाला आहे. लोकसभा निवडणुकीत आघाडीसाठी ठाकरे यांनी राज्यात सर्वत्र सभा घेतल्या होत्या. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही मनसे आघाडीसमवेत असेल, असा होरा बांधला जात आहे. मात्र, मनसे स्वबळावर लढणार आहे, असेही म्हटले जात आहे. 

आज पुण्यातील बैठकीच्या पार्श्‍वभूमीवर मनसेचे सरचिटणीस आणि प्रवक्ते हेमंत संभूस म्हणाले, ‘‘विधानसभा निवडणुकीबाबत निर्णय झाला नाही. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा झाल्यावर ठाकरे स्वतः याबाबतचा निर्णय जाहीर करतील.’’ 

आघाडी केल्यास किती जागांवर निवडणूक लढवायची, पुणे-मुंबई, नाशिकमध्ये किती जागा असतील, याबाबतही विचारविनिमयानंतर निर्णय जाहीर करू, असेही त्यांनी सांगितले. मात्र, फडणवीस सरकारच्या कारभारावर नागरिक नाराज असून त्याबाबत कार्यकर्ते राज्यात जागरूकता निर्माण करतील, अशी भूमिकाही त्यांनी मांडली. पुण्यात किती जागा लढवायच्या याबाबत आज चाचपणी झाली.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News