दयानंद कला महाविद्यालयात विधानसभा  निवडणुकीसाठी मतदान जनजागृती अभियान 

सकाळ वृतसेवा (यिनबझ)
Thursday, 17 October 2019
  • दयानंद कला महाविद्यालयातील राज्यशास्त्र व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2019 च्या अनुशंगाने मतदान जनजागृती अभियान राबविले जात आहे.

लातूर - दयानंद कला महाविद्यालयातील राज्यशास्त्र व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2019 च्या अनुशंगाने मतदान जनजागृती अभियान राबविले जात आहे. या अभियाना अंतर्गत 21 आक्टोबर 2019  रोजी मतदान करण्याबाबत 623 विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक व समाजातील नागरिकाकडून संकल्प पत्र भरून घेवून मतदान जनजागृती करण्यात आली. 

या प्रसंगी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एस. पी. गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक रासेयो जिल्हा समन्वयक डॉ. संतोष पाटील यांनी केले तर सुत्रसंचलन प्रा. विलास कोमटवाड यांनी केले. पर्यवेक्षक डॉ. दिलीप नागरगोजे, डॉ. प्रदीप सुर्यवंशी, डॉ. अंजली जोशी, डॉ. संदीप जगदाळे, डॉ. सुभाष कदम, प्रा. राजू मोरे, कार्यालयीन अधिक्षक श्री. नवनाथ भालेराव उपस्थित होते. संकल्पपत्र भरून घेण्यासाठी श्री. विष्णू चांदूरे, मुंढे व भरत पवार यांनी परिश्रम घेतले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News