व्हिडिओ: पुणेकरांना मिळणार आता काळं पाणी;  नैसर्गिक काळे पाणी बाजारात 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 19 June 2019

काळया पाण्याच्या शिक्षेबद्दल आपण शाळेत असताना ऐकलं आहे. पण कधी तुम्हाला देखील खरोखर काळं पाणी पिण्यास दिलं तर? होय खरोखर पुण्यामध्ये ए. व्ही. ऑरगॅनिक्स या स्टार्ट-अप व्हेंचरने ‘इवोकस’ हे भारतातील पहिले नैसर्गिक काळे अल्कलाइन पाणी बाजारात विक्रीला आणले आहे.

पुणे: काळया पाण्याच्या शिक्षेबद्दल आपण शाळेत असताना ऐकलं आहे. पण कधी तुम्हाला देखील खरोखर काळं पाणी पिण्यास दिलं तर? होय खरोखर पुण्यामध्ये ए. व्ही. ऑरगॅनिक्स या स्टार्ट-अप व्हेंचरने ‘इवोकस’ हे भारतातील पहिले नैसर्गिक काळे अल्कलाइन पाणी बाजारात विक्रीला आणले आहे.  या पूर्णतः शुद्ध केलेल्या पाण्यामध्ये 70 हून अधिक नैसर्गिक खनिजांचा समावेश केला आहे आणि ते पूर्णतः ऑटोमेटेड, स्टराइल स्वरुपात आहे. अमेरिकेतील टेक्सास येथील संशोधक डॉ. नोबर्ट चिराज़े यांनी शोधल्यानुसार, पृथ्वीच्या खोल कवचातून मिळवलेल्या ब्लेंडेड नैसर्गिक खनिजांमुळे पाण्याला काळा रंग प्राप्त झाला आहे. 

कंपनीचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक आकाश वाघेला यांनी सांगितले की, “ इवोकसमधील घटकांमुळे दर्जेदार व सातत्यपूर्ण हायड्रेशन राखले जाते, उत्तम डिटॉक्सिफिकेशन होते व सुधारित मेटॅबोलिझम हा फायदा मिळतो. आज, ग्राहक व प्रमुख्याने युवक व तरुण प्रौढ हे आरोग्याविषयी जागरुक आहेत, त्यांना  पोटेबल वॉटरसह सर्व उत्पादन क्षेणींच्या बाबतीत आरोग्यदायी पर्याय हवे आहेत. नव्या आरोग्यदायी उत्पादनांचा स्वीकार करण्यासाठी उत्सुक असणाऱ्या तरुणांची मोठी संख्या विचारात घेता, अधिक हायड्रेशन व उत्तम डिटॉक्सिफिकेशन देणारे अल्कलाइन पाणी दाखल करण्यासाठी पुणे हे आदर्श ठिकाण आहे.''<

>

 कंपनीने गुजरातमधील वडोदरा प्रकल्प सुरु केला असून त्यासाठी सुमारे ७ कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे.  संशोधन व विकास युनिटबरोबर, पूर्णतः ऑटोमेटेड उत्पादन व बॉटलिंग प्रकल्पामध्ये दरवर्षी 4 कोटी बाटल्यांची निर्मिती करण्याची क्षमता आहे. आंतरराष्ट्रीय संकल्पना आणि उत्पादन भारतामध्ये सादर करून, इवोकसचे उत्पादन प्रकल्प भारत सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमानुसार कार्यरत आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News