विकी कौशलला ‘भूताने झपाटल’

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 11 June 2019

बॉलीवूडमधील आघाडीचा कलाकार विकी कौशलचा ‘भूत’ चित्रपटाच्या पोस्टरवर त्याचा भयावह लूक झळकला.

बॉलीवूडमधील आघाडीचा कलाकार विकी कौशल ‘भूत’ या भयपटातून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे.

या चित्रपटाच्या पोस्टरवर त्याचा भयावह लूक झळकला असून, त्यात विकी खिडकीमध्ये उभे राहून मदतीसाठी हाक देताना दिसत आहे. त्याच्या चेहऱ्यावरील भीतीचे हावभाव लक्षवेधी आहेत.

भानूप्रताप सिंह या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. शिवाय शशांक खेतान आणि करण जौहर मिळून या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.

विकीबरोबरच भूमी पेडणेकरही या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसेल. 

या चित्रपटाचे पोस्टर पाहता चित्रपटाच्या कथेविषयी साऱ्यांच्याच मनात उत्सुकता लागून राहिली. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News