ज्येष्ठ लेखक, अभिनेते गिरीश कर्नाड यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 10 June 2019

प्रख्यात नाटककार, अभिनेते व दिग्दर्शक डॉ. गिरीश कर्नाड यांचे दीर्घ आजाराने निधन, ते 81 वर्षांचे होते. बेंगळुरूतील राहत्या घरी त्यांच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून उपचार सुरू होते, तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला

कर्नाड यांच्या निधनामुळे भारतीय साहित्य, सांस्कृतिक व सामाजिक वर्तुळातील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे 

 गिरीश कर्नाड कोण? :

▪ कर्नाड यांना 1974 मध्ये पद्मश्री, 1992 मध्ये पद्मभूषणने सन्मानित करण्यात आले होते. 1994 मध्ये त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला होता. 
▪ 1998 मध्ये कर्नाड यांना ज्ञानपीठ पुरस्काराने गौरवण्यात आले होते. ययाति, तुघलक, हयवदन यासारखी त्यांनी लिहिलेली कन्नड नाटकं गाजली.
▪ मराठी चित्रपट 'उंबरठा'मध्येही त्यांनी भूमिका साकारली होती. तसेच तुघलक, नागमंडल, हयवदन या मराठी नाटकांचे त्यांनी दिग्दर्शन केले. 
 
Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News