वारं कबड्डीचं : नवा उत्साह नवा जोश 

निवृत्ती बाबर
Sunday, 7 July 2019

सध्या सर्वत्र क्रिकेटचे वारे वाहत आहे. जिथे बघावं तिथे क्रिकेट क्रिकेट आणि फक्त क्रिकेटचीच चर्चा सुरू आहे. कोण जिंकलं आणि कोण हारलं याची चर्चा गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत चालू असते. तसं पाहायला गेलं तर क्रिकेट हा आपला खेळ नाही तो परदेशी खेळ आहे. तरीसुद्धा क्रिकेटची वेगळी प्रतिमा भारतामध्ये दिसून येते. 

सध्या सर्वत्र क्रिकेटचे वारे वाहत आहे. जिथे बघावं तिथे क्रिकेट क्रिकेट आणि फक्त क्रिकेटचीच चर्चा सुरू आहे. कोण जिंकलं आणि कोण हारलं याची चर्चा गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत चालू असते. तसं पाहायला गेलं तर क्रिकेट हा आपला खेळ नाही तो परदेशी खेळ आहे. तरीसुद्धा क्रिकेटची वेगळी प्रतिमा भारतामध्ये दिसून येते. 

भारतीय खेळाडू तर आपला वेगळा ठसा क्रिकेटवर उमटवत असतात. त्यापेक्षाही भारतीय प्रेक्षक तर एकही संधी सोडत नाहीत की आपण आगळे-वेगळे चाहते कसे बनू शकतो याची. परंतु क्रिकेटमुळे भारताचे दुसरे खेळांकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. भारतामध्ये क्रिकेटमुळेच दुसऱ्या खेळांना वंचितचा दर्जा मिळाला आहे, असं म्हटल तरी वावगं ठरणार नाही. त्यापैकीच एक कबड्डी. 

कबड्डी हा खेळ महाराष्ट्रापासून ओळखला जातो. कबड्डी ही लाल मातीत खेळली जायची. म्हणून कबड्डी ही लाल मातीचा खेळ म्हणून ओळखला जायचा, परंतु बदलत्या विज्ञान-तंत्रज्ञामुळे हा खेळ मॅटवर खेळवायला सुरुवात झाली. याचाच एक भाग म्हणजे प्रो कबड्डी लीग.

प्रो कबड्डी लीग (PKL) ही अतिशय प्रतिष्ठित, भारतातील एक व्यावसायिक कबड्डी लीग आहे. २६ जुलै, इ.स. २०१४ रोजी सुरु झालेल्या या स्पर्धेच्या पहिल्या आवृत्तीत जगभरातील खेळाडूंसह ८ संघ सहभागी झाले. सध्या ह्या स्पर्धेवर माशल स्पोर्टस् च्या व्यवस्थापकीय संचालक चारू शर्मा यांचे नियंत्रण आहे.

प्रो कबड्डी लीगचे हे सातवे हंगाम असून यया हंगामाला २० जुलै रोजी सुरुवात होणार आहे. सातव्या हंगामाचे वेळापत्रक शुक्रवारी जाहीर करण्यात आले. तेलुगू टायटन्स आणि यू मुंबा यांच्यात 20 जुलैला सलामीचा सामना हैदराबाद येथे होणार आहे. पहिल्याच दिवशी सध्याच विजेता बंगळुरू बुल्स आणि तीन वेळेचा विजेता पाटणा पायरेट्स यांच्यात दुसरा सामना खेळवण्यात येणार आहे. 

प्रो कबड्डी लीगमधील थरार कायम राखण्यासाठी यंदा फॉरमॅटमध्ये बदल करण्यात येणार आहेत. लीगचा अंतिम सामना 19 ऑक्टोबरला खेळवण्यात येणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News