या पुरग्रस्ताने चक्क सदाभाऊ खोत यांना केली शिवीगाळ, व्हिडियो व्हायरल

जयेश सावंत (यिनबझ)
Tuesday, 13 August 2019

राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पूरग्रस्त भागांना भेट दिली, त्यादरम्यान एका पूरग्रस्त वयोवृध्दाने हा घडलेला प्रकार समोर आणला.

सांगली : महाराष्ट्रातील पूर जरी ओसरला असला, तरी पुरग्रस्तांचे संसार उध्वस्त झाले आहेत. दुष्काळग्रस्तांपर्यंत मदत पोचेल तेव्हा पोचेल, परंतु काही नेत्यांनी दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करण्यास आता सुरुवात केली आहे.

राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पूरग्रस्त भागांना भेट दिली, त्यादरम्यान एका पूरग्रस्त वयोवृध्दाने हा घडलेला प्रकार समोर आणला. एका व्हायरल  व्हिडियोमध्ये वयोवृद्धाने आपली व्यथा मांडली. त्यात ते सांगत होते की, स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांकडून दुष्काळग्रस्तांना काहीच मदत मिळाली नाही. परंतु पंचायत समिती, आणि नेते विजय पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी येथील तिन्ही पूरग्रस्त विभागांना मदत पुरविली.

पुरग्रस्तांची जेवणापासून ते राहण्यापर्यंत पूर्णतः सोय करण्यात आली तर पुढे सांगताना ते असेही म्हणाले की, स्थानिकांना मदत करण्याचा आव आणणारे सदाभाऊ खोत आणि त्यांचे कार्यकर्ते तर होडीतून आले आणि क्षणभर  पाहणी केली आणि निघून गेले. व त्यानंतर पुन्हा या विभागात फिरकलेच नाहीत. अशी तीव्र शब्दांत तेथील गावकऱ्यांनी आपली व्यथा मांडली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News