वीर भगतसिंग परिषद; विद्यार्थी हितासाठी सतत लढणारी संघटना  

नीरज बुटे
Friday, 25 January 2019

राष्ट्र, समाजकार्यासह नेहमी विद्यार्थी हितासाठी लढणारी संघटना म्हणजे वर्धा जिल्ह्यातील  वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद होय. १५ ऑगस्ट, २६ जानेवारीला राष्ट्रध्वज खाली पडू नये, तसेच दिसलेले राष्ट्रध्वज सन्मानाने गोळा करण्याचे काम वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद गेल्या अनेक वर्षांपासून करीत आहे. स्थानिक पोलिस प्रशासन तसेच राळेगाव पत्रकार संघटनेतर्फे गौरवही केला आहे. महिला, विद्यार्थ्यासाठी मार्केट परिसरात प्रसाधनगृह बनावे, यासाठी आंदोलन करून प्रशासनाला प्रसाधनगृह बांधायला भाग पाडण्याचे काम केले. तसेच बसवर चिटकवलेले फाटलेल्या अवस्थेतील राष्ट्रध्वज प्रशासनाला २४ तासाच्या आत काढायला लावले.

राष्ट्र, समाजकार्यासह नेहमी विद्यार्थी हितासाठी लढणारी संघटना म्हणजे वर्धा जिल्ह्यातील  वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद होय. १५ ऑगस्ट, २६ जानेवारीला राष्ट्रध्वज खाली पडू नये, तसेच दिसलेले राष्ट्रध्वज सन्मानाने गोळा करण्याचे काम वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद गेल्या अनेक वर्षांपासून करीत आहे. स्थानिक पोलिस प्रशासन तसेच राळेगाव पत्रकार संघटनेतर्फे गौरवही केला आहे. महिला, विद्यार्थ्यासाठी मार्केट परिसरात प्रसाधनगृह बनावे, यासाठी आंदोलन करून प्रशासनाला प्रसाधनगृह बांधायला भाग पाडण्याचे काम केले. तसेच बसवर चिटकवलेले फाटलेल्या अवस्थेतील राष्ट्रध्वज प्रशासनाला २४ तासाच्या आत काढायला लावले. आतापर्यंत ५४ गरजू विद्यार्थ्याना पुस्तकांचे वाटप केले.

कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यावर अन्याय झाला, त्यावेळी त्यांच्यासाठी पाच दिवसाचे ठिय्या आंदोलन, शहीत भगतसिंग जयंतीला एकाचवेळी ११० तरुण-तरुणींचा नेत्रदानाचा संकल्प, आत्महत्या ग्रस्थ शेतकऱ्याच्या ‘मुलांना बसच्या पासमध्ये सवलत देण्याची मागणी, अंगणवाड्यांचे डिजिटलायजेशन करून ग्रामीण विद्यार्थ्याना आधुनिक शिक्षण देण्याची मागणी, टवाळखोरांना आळा घालण्यासाठी हींगणघाटमध्ये चार्ली पथकाची निर्मिती करण्याची मागणी केली.

 महापुरुषांच्या जयंतीला शहरात व ग्रामीण भागात कार्यक्रम घेऊन प्रबोधन करण्याचे काम ‘वीर भगतसींग विद्यार्थी परिषदेने केले आहे.आत्महत्या ग्रस्थ शेतकऱ्याच्या पाल्यांना एमपीएससीच्या पुस्तकांचे वाटप, मगरूळ येथे शाळेच्या परिसरात अवैध दारु विक्री बंद केली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्याना छत्र्यांचे वाटप, गुणवंत विद्यार्थी, युवकांचा गौरव सोहळा, ग्रामीण विद्यार्थ्यासाठी बससेवा सुरळीत करण्याची मागणी,  आत्महत्या ग्रस्थ शेतकऱ्याच्या पाल्यांना मोफत इंग्लिश शिक्षण देणे, विद्याथ्र्यांची स्कॉलरशिप त्वरित मीळावी, यासाठी प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देऊन आंदोलन वीर भगतसिन  विद्यार्थी परिषदेच्या वतीने करण्यात आले. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News