|| अखंडतेची वारी ||

सुनिल पवार
Monday, 1 July 2019

केली कायेची पंढरी
आत्मा सखा पांडुरंग

केली कायेची पंढरी
आत्मा सखा पांडुरंग
मन भजनात त्याच्या
नित्यनेमे असे दंग..!!

पाची इंद्रियांचा मेळा
त्याच्या पायाशी जमतो
माय माझी रखमाई
तिच्या कुशीत खेळतो..!!

मुखी विठ्ठल विठ्ठल
कर्म झाले चंद्रभागा
कशा बुडतील गाथा
नाही मरण अभंगा..!!

देह जरी हा नश्वर 
पाडू नकोस विसर..
वारी चालू दे अखंड
जाईना का चितेवर..!!

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News