वारी वारी सद्विविवेकाची 

दिव्या विजय भोसले, सातारा
Sunday, 30 June 2019

गेल्या दोन सप्ताहापासून विठुनामाचा जयघोष वातावरण भक्तिमय करत आहे. अगदी चिमुकल्यांपासून - अबालवृद्धापर्यंत सर्वच थरांतील वैष्णवजन तहान -भूक विसरून विठुरायाची पंढरी जवळ करीत आहेत. विठुरायाच्या भेटीची ओढ त्यांना ऊर्जा देत आहे. ऊन, वारा, पाऊस कशाचीच पर्वा न करता वारी पुढे सरकत आहे. 

गेल्या दोन सप्ताहापासून विठुनामाचा जयघोष वातावरण भक्तिमय करत आहे. अगदी चिमुकल्यांपासून - अबालवृद्धापर्यंत सर्वच थरांतील वैष्णवजन तहान -भूक विसरून विठुरायाची पंढरी जवळ करीत आहेत. विठुरायाच्या भेटीची ओढ त्यांना ऊर्जा देत आहे. ऊन, वारा, पाऊस कशाचीच पर्वा न करता वारी पुढे सरकत आहे. 

पूर्वीपेक्षाआता वारीचा आकार खूप मोठया प्रमाणावर वाढला आहे. आजचा तरुणवर्गसुद्धा मोठ्या उत्साहाने वारीत सहभागी होताना दिसत आहे. वयोवृद्धाच्या तुलनेत तरुनांची संख्या वरचेवर वाढत आहे. थोडक्यात, पंढरीच्या वारीमुळे आजच्या तरुणपिढीला आध्यात्मिकतेची गोडी लागत आहे. अर्थात या गोष्टीचा आनंद सर्वांनाच आहे. परंतु पंढरीची वारी म्हणजे एक - दीड महिन्याची नुसती पायपीट न वाटता ती रोजच्या जगण्यातुन दिसली पाहिजे. 

आषाढी वारी करणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याने संत - शिकवणीप्रमाणे आचारण केले पाहिजे. संत - शिकवण आपल्या वर्तनात उतरवली पाहिजे. वारीत सामील होणाऱ्या तरुणासाठीच नव्हे, तर सर्वच तरुणाईसाठी आई - वडिलांची सेवा आणी राष्ट्रसेवा हे आद्य कर्तव्य असले पाहिजे. त्याबरोबरच आपण ज्या क्षेत्रात काम करतो तिथे प्रामाणिकपणा व पारदर्शीपणा अंगीकारणे व रुजवणे हे देखील राष्ट्रसेवेचेच कार्य आहे. तिसरे आणि महत्वाचे मूल्य म्हणजे जात-धर्म, उच-नीच असा भेद न करता सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे. आणि चौथे मूल्य ते म्हणजे पर्यावरणाचे रक्षण केलेच पाहिजे कारण पर्यावरण टिकले तरच आपण टिकणार आहोत. 

दैनंदिन जीवनातही आपले वागणे, बोलणे सदभावनेतूनच असले पाहिजे. कोणतेही कार्य करताना सद्सद्विवेक बुद्धीने विचार केला पाहिजे. त्यामुळे आजच्या प्रत्येक तरुणाने असा विचार केला पाहिजे की, मी त्या महाराष्ट्रात राहतो, ज्या महाराष्ट्रात संत ज्ञानेश्वर महाराजांनी आयुष्याचा अर्थ सांगनारी "ज्ञानेश्वरी" लिहिली. मी अशा महाराष्ट्रात ज्या महाराष्ट्रातल्या माणसांना संत तुकाराम महाराजांनी माणसासारखं जगायला शिकवलं. मी त्या महाराष्ट्रात राहतो ज्या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांसारखा सर्वगुणसंपन्न राजा लाभला. या माझ्या सुवर्णंतेजी महाराष्ट्राची ओळख असलेली अतीपावन अशी पंढरीची वारी ही फक्त एक-दीड महिन्यांपूर्ती मर्यादित न राहता सद्गुणांची व सद्वर्तनाची वारी झाली पाहिजे. 

आपल्या सर्वांनासाठी पूजनीय असलेली आषाढी वारी सभ्यतेचे सद् वर्तनाचे प्रतीक बनली पाहिजे.अध्यात्मिकतेला सुकृतीची जोड मिळाली पाहिजे. लोप पावत चाललेली आपल्या महाराष्ट्राची संत-संस्कृती आपण तरुणानी जगण्यातुन जपली पाहिजे वारकरी संप्रदायाच्या व्याप्तीबरोबरच त्यातील संत - शिकवनीचे गुह्य जनमनात रुजवले गेले पाहिजे. त्यामुळे आजच्या तरुणाईने ही काही मूल्ये स्वीकारून स्वतःचा व समाजाचा विकास साधला तर संत - परंपरेचा वारसा असलेला आपला महाराष्ट्र अधिकाधिक शुभ्र व तेजस्वी असेल. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News