''वारी स्वच्छतेचि पवित्र इंद्रायणीची''

निवृत्ती बाबर (यिनबझ)
Monday, 27 May 2019
  • मोदी सरकार २०१४ साली मोठे नारे लगावत सत्तेत आले. २०१४ साली मोदी लाट होती
  •  २०१९ साली एक प्रकारे मोदी लाटेचे रूपांतर मोदी त्सुनामीमध्ये झाले.
  • मोदींनी २०१४ साली सरकार स्थापन केले. त्यांनतर गांधी जयंती निमित्त संपूर्ण भारतभर एक संकल्प राबवण्याचं ठरवलं होत, तो संकल्प म्हणजे ''स्वच्छ  भारत अभियान''
  • या संकल्पाच्या माध्यमातून अनेक तरुण-तरुणी, ज्येष्ठांपासून ते श्रेष्ठांपर्यंत मोहिमेला साथ देत होते.

मोदी सरकार २०१४ साली मोठे नारे लगावत सत्तेत आले. २०१४ साली मोदी लाट होती तर, २०१९ साली एक प्रकारे मोदी लाटेचे रूपांतर मोदी त्सुनामीमध्ये झाले. मोदींनी २०१४ साली सरकार स्थापन केले. त्यांनतर गांधी जयंती निमित्त संपूर्ण भारतभर एक संकल्प राबवण्याचं ठरवलं होत, तो संकल्प म्हणजे ''स्वच्छ  भारत अभियान'' या संकल्पाच्या माध्यमातून अनेक तरुण-तरुणी, ज्येष्ठांपासून ते श्रेष्ठांपर्यंत मोहिमेला साथ देत होते.

या माध्यमातून अनेक गावे-शहरे स्वच्छ होऊ लागली. त्याच प्रकारे अनेक गावे हागणदारी मुक्त होऊ लागली. स्वच्छ भारत अभियानाचाच एक भाग म्हणजे भारतातल्या सर्व नद्या स्वच्छ करणे. भारतामध्ये नद्यांना पावित्र्याचे स्थान दिले जाते. परंतु भारतातल्या प्रत्येक नदीमध्ये कचऱ्याचे साम्राज्य पाहायला मिळते. सर्व भारतवासियांना मोदींनी एक शब्द दिला होता की, भारतातील एकूण एक नदी स्वछ होईल व नद्यांचे जे पावित्र्याच स्थान आहे ते परत मिळवून देईन. परंतु हे कमी चित्र पाहायला मिळत आहे. स्वच्छ  व सुंदर नदी बनविणे याकडे मोदी सरकारचे लक्ष दूर झालेले दिसत आहे. आपण सर्व नद्या पवित्र करणार आहोत याचा विसर मोदी सरकारला पडला आहे. 

याचाच एक भाग म्हणजे आळंदीची इंद्रायणी नदी..! महाराष्ट्र हा वारकरी सांप्रादय आहे. अनेक वारकरी संत महाराष्ट्राच्या जन्मभूमीत जन्माला आले. आळंदी येथे विश्वाच्या माउली ज्ञानोबाराय यांची समाधी आहे. येथेच असणारी महाराष्ट्राची पवित्र ''इंद्रायणी नदी'' महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून अनेक भाविक भक्तजण ज्ञानोबांच्या समाधीवर मस्तक ठेवण्यास आतुर असतात. समाधीचे दर्शन घेण्याअगोदर भाविक भक्त पवित्र अशा इंद्रायणीमध्ये स्नान करत असतात.

परंतु इंद्रायणीमध्ये दगड-गोटे, भाविकांनी टाकलेले निर्माल्य व वेगळ्या प्रकारचा कचरा निर्माण झाला होता. अशा अनेक कचऱ्यामुळे इंद्रायणीचे पावित्र्य लयाला गेलेले आहे, असे चित्र दिसत आहे. एक महिन्यावर पंढरपूरची आषाढी वारी येऊन ठेपली आहे. त्याचे प्रस्थान माउलींच्या अलंकापुरीतून होणार आहे. भाविक भक्त यासाठी आवर्जून हजेरी लावतात, परंतु नदीच्या घाटावर कचऱ्याचे साम्राज्य पाहायला मिळत होते. यामुळे अनेक वारकरी बांधव त्रासाला बळी पडत होते. 

या त्रासातून मुक्तता व्हावी आणि आपल्या अलंकापुरीच्या पावित्र्य नदीचे पावित्र्यपण परत यावे म्हणून ''चला वारीला'' फेसबुक पेज व ''छावा संघटना'' यांनी पुढाकार घेतला.

''वारी स्वच्छतेची पवित्र इंद्रायणीची'' या मोहिमेतून इंद्रायणी पावित्र्य करण्याचे ठरविले.

गेली चार वर्ष महाराष्ट्रातील तमाम वारकरी बांधवाना व महाराष्ट्रातील जनतेला जोडण्याचे काम चला वारीला फेसबुक पेजने केले आहे.

त्याचप्रमाणे इंद्रायणी स्वच्छ व्हावी हेही काम करण्यास "चला वारीला" व "छावा संघटना" कमी पडले नाहीत. गेली २० ते २५ दिवस सोशल मीडियाच्या व इतर माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेला इंद्रायणीचे पावित्र्य परत यावे म्हणून सहभागी होण्याचे आवाहन केले. या आवाहनाला महाराष्ट्रातून चांगल्या प्रकारे पाठिंबा दिल्याचे चित्र दिनांक २६ मे रोजी पाहायला मिळाले. 

''वारी स्वच्छतेची पवित्र इंद्रायणीची'' या मोहिमेला सुरुवात दिनांक २६ मे २०१९ रोजी सकाळी ७.३० वाजता इंद्रायणी नदी व इंद्रायणीचा घाट साफ-सफाई करण्यास सुरुवात झाली. या वेळेस ५०० तरुण- तरुणी, सोबतच आळंदीत आलेले वारकरी बांधव व समस्त आळंदीकर या मोहिमेत सहभागी होते. नागरिक व तरुण इंद्रायणीमध्ये उतरून नदी साफ करत होते. काहीजण बाजूचा परिसर साफ करण्यात व्यस्त होते. इंद्रायणीच्या आजूबाजूचा सुमारे १० टन एवढा कचरा  काढला. या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे काम आळंदी नगरपालिका यांच्याकडे सोपवण्यात आले.

या सर्वांच्या अतोनात मेहनतीमुळे पवित्र समजली जाणारी इंद्रायणी खऱ्या अर्थाने पावित्र्य झाली.

''आज आळंदी येथे आयोजित केलेल्या पवित्र इंद्रायणी नदी स्वच्छता अभियानात सहभागी झालेल्या सर्व सेवाभावी संस्था, स्वयंसेवक व वारकरी बांधव या सर्वांचे आभार नदीच्या घाटावर व प्रत्यक्ष नदीच्या पात्रात उतरून निर्माल्य,प्लास्टिक,कचरा असा जवळ जवळ १० टन कचरा आज गोळा केला. तुमच्या सहकार्यामुळेच हा उपक्रम यशस्वी होऊ शकला. या बळावर पुढील उपक्रम देखील मोठ्या ताकदीने होईल याची मला शाश्वती आहे. "चला वारीला" टिम व "छावा संघटना" आपले सदैव ऋणी आहोत'' - अविनाश सूर्यवंशी (ऍडमीन चला वारीला फेसबुक पेज)

पाहा व्हिडिओ 

  • आळंदी येथे इंद्रायणीनीची साफ-सफाई करताना तरुण-तरुणी, व महाराष्ट्रातील अनेक भाविक भक्त 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News