विधानसभेतही वंचित आणि MIM सोबतच लढणार ; काँग्रेसमुळे मुस्लिम समाज वंचितपासून दूर ?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 8 June 2019
  • वंचित व एमआयएम आघाडी तुटणार नाही

  • मुस्लिम मतदार काँग्रेसकडे गेला

  • विधानसभेत चित्र वेगळे राहील 

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीची मोट बांधून त्यात एमआयएमला सोबत घेऊन दलित, वंचित घटक आणि मुस्लिम मतांच्या जोरावर आघाडीचे अनेक उमेदवार विजयी होतील, अशी अपेक्षा होती. मात्र एमआयएमचे इम्तियाज जलील यांचा अपवाद वगळता राज्यात आघाडीला यश मिळाले नाही. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित आघाडीसोबत एमआयएम राहील की नाही अशी चर्चा राजकीय गोटात सुरू झाली आहे. 

वंचित, एमआयएम सोबतच राहणार


प्रा. यशपाल भिंगे 

आगामी विधानसभा निवडणुकीतही वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम साेबत राहील, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. एमआयएमच्या माध्यमातून जरी मुस्लिम मते वंचितकडे वळली नाही तरी आघाडी तुटणार नाही. विधानसभेत ही आघाडी कायम राहील. प्रा. भिंगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबादला इम्तियाज जलील विजयी झाल्यानंतर आता मुस्लिम समाजालाही वंचित आघाडी विजयी होऊ शकते अशी खात्री पटली आहे. मुस्लिम समाजही सत्तेत आला पाहिजे ही वंचित आघाडीची भूमिका आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत वंचितसोबत एमआयएम राहणार आहेच. परंतु मुस्लिम समाजालाही वंचित आघाडी मोदींना पर्याय ठरू शकते हे लोकसभेत दिसलेल्या शक्तीवरुन खात्री पटल्याने तोही समाज विधानसभेत वंचितसोबत राहील असेही प्रा. भिंगे म्हणाले.

वंचित आघाडी ही भाजपची बी टीम ?

प्रा. डाॅ. यशपाल भिंगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेंद्र मोदी सत्तेतून दूर गेले पाहिजे अशी मानसिकता मुस्लिम समाजाची होती. काँग्रेसतर्फे संपूर्ण राज्यात वंचित आघाडी ही भाजपची बी टीम आहे असा प्रचार करण्यात आला. वस्तुस्थिती तशी नव्हती. समाजातील एक मोठा वर्ग सत्तेच्या प्रवाहापासून दूर आहे. त्याला सत्तेत सहभागी करून घेतले पाहिजे या विचाराने एमआयएमशी आघाडी करण्यात आली. परंतु काँग्रेसच्या प्रचारामुळे तो समाज वंचितकडे आला नाही.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News