आरटीओला रिक्त पदाचे ग्रहण

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 5 July 2019
  • मोटार वाहन निरीक्षकांची एकूण १३ पदे मंजूर असून, सहा अधिकारी कार्यरत आहेत .

अकोला - माहिती आणि  तंत्रज्ञानाच्या काळात सर्वच गोष्टी गतीमान झाल्या असताना आरटीओ विभागाला रिक्तपदाने ग्रासले आहे . मोटार वाहन निरीक्षकांसह सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांचे पदे रिक्त असतानाही दर दिवसाला लाख रूपयांचा दंड वसूल करण्याचे आदेश  वरिष्ठ कार्यालयाने दिल्याने अधिकारी कर्मचाऱ्यांची धांदल उडाली आहे.

सर्वसामान्यांचा  आयुष्यात  एकदा तरी प्रादेशीक परिवहन (आरटीओ) कार्यालयाशी संपर्क येतोच. याच कार्यालयाकडून नागरिकांसाठी विविध प्रकारच्या ३० सेवा पुरविल्या जातात. यामध्ये अाता सध्या २६ सेवांचे कामकाज ऑनलाईन  झाले असून, उर्वरीत चार सेवा मेन्युअली पुरविल्या जातात. याचसोबत वाहनांची तपासणी आणि   पासिंगचे कामकाज या कार्यालयाकडे असल्याने कामाचे अोझे वाढणार यात शंका नाही. असे जरी असले तरी मात्र, येथील आरटीओला  कार्यालयाला रिक्त पदाचे ग्रहण लागल्याचे चित्र आहे. आहे त्याच मनुष्यबळावर कार्यालयाचा गाढा हाकल्या जात असून, लक्षांक पूर्ण केल्या जात असल्याची माहिती उपप्रादेशीक परिवहन अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

महसूल गोळा करण्याचा प्रश्‍न
आहे त्याच मनुष्यबळावर अकोला उपप्रादेशिक परिवहन विभागाला महिन्याला २४ लाख रुपयांचे टार्गेट देण्यात अाले आहे. दर दिवसाला एक लाख रुपयांचा महसूल गोळा कराच असा आदेश असल्याने मोटार वाहन निरीक्षकांना हा महसूल गोळा कसा करायाचा असा प्रश्न पडला आहे.

अशी आहेत  रिक्त पदे
मोटार वाहन निरीक्षकांची एकूण १३ पदे मंजूर असून, सहा अधिकारी कार्यरत आहेत . तर कार्यरतपैकी दोन अधिकाऱ्यांची सेवा मुंबई कार्यालयाशी सलग्न करण्यात आली  आहे. तर सध्या सात रिक्त पदे आहेत . याचसोबत सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांची २० पदे मंजूर असून, तीन जण कार्यरत आहेत . तर उर्वरीत १७ पदे रिक्त आहेत .

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News