आनंदवन

अंजना कर्णिक
Thursday, 1 August 2019

काल आमच्या 'शिवाजी पार्क इनरव्हिल क्लबने' वडाळ्याच्या अॅक्वर्थ लेप्रसी हॉस्पिटला सहाय्यक ओषधांची मदत करण्यासाठी म्हणून भेट ठरवली होती. खाऊ वाटपही झाले. 

पण तेथून आल्यापासून  मनात अस्वस्थता दाटून आलीय. या पुर्वी मी बाबा आमटे यांच्या प्रसिद्ध आनंदवनाला चार पाच वर्षापुर्वी पाच दिवसांची निवासी भेट दिली होती. तेंव्हाही मन असेच बेचैन होते. 
खरतर काल भेट दिलेल्या अॅक्वर्थ होममधे वातावरण घरगूती होतं. अतिशय स्वच्छता साभाळलेय तिथे. सत्तर ऐंशी रुग्णांना सर्व औषधपाणी, जेवणखाण, तपासण्या याची चांगली सोय आहे.

काल आमच्या 'शिवाजी पार्क इनरव्हिल क्लबने' वडाळ्याच्या अॅक्वर्थ लेप्रसी हॉस्पिटला सहाय्यक ओषधांची मदत करण्यासाठी म्हणून भेट ठरवली होती. खाऊ वाटपही झाले. 

पण तेथून आल्यापासून  मनात अस्वस्थता दाटून आलीय. या पुर्वी मी बाबा आमटे यांच्या प्रसिद्ध आनंदवनाला चार पाच वर्षापुर्वी पाच दिवसांची निवासी भेट दिली होती. तेंव्हाही मन असेच बेचैन होते. 
खरतर काल भेट दिलेल्या अॅक्वर्थ होममधे वातावरण घरगूती होतं. अतिशय स्वच्छता साभाळलेय तिथे. सत्तर ऐंशी रुग्णांना सर्व औषधपाणी, जेवणखाण, तपासण्या याची चांगली सोय आहे.

संपुर्ण परिसर दाट हिरव्यागार झाडींनी आच्छादित आहे. निवासींसाठी मनोरंजनार्थ टि. व्ही संच, वृत्तपत्र आहेत. विविध संस्था भेटी देतात. काही भजनी मंडळ येथे गुरवारी भजनही सादर करतात. वरवर पाहता सार आलबेल आहे. सध्या खरं तर येथे संसर्गावस्थेत असलेला कोणीही पेशंट नाही. आहेत ते बरे झालेले !पण...

या रोगानी त्यांच्या अंगावर आपल्या विद्रुपतेच्या अस्तित्वाच्या ज्या खुणा सोडल्यात त्यांनी या रुग्णांना जग, कुटूंब, आपली माणसं, नाती, घर दार, मुलबाळ यांच्यापासून तोडलय! एकाकी केलय! ते तसे एकमेकांबरोबर राहतात. तेच आता एकमेकांचे सगे सोयरे! डाॅक्टर्स आणि समाजसेवक त्यांना देवासारखे वाटतात!

आमच्यासारख्या काही एन.जी.ओच्या सभासद त्यांच्याकडे बाहेरच्या जगातून भलेही त्यांच जमेल तस भलं करायला गेल्या, त्यांना चार आनंदाचे क्षण वाटायला गेल्या तरी त्यांच्या चेहर्‍यावरच एकाकीपण लपत नाही. केविलवाणेपणाचा एक तवंग चेहर्‍यावन दिसतो. आणि या एकाकी अवस्थेत रे रुग्ण वर्षानुवर्षे मरण येत नाही जगत असतात. त्यातलेच काही हात पाय धड असलेले, बरे झालेले रुग्ण तेथेच राहून अापल्या अपंग बाधवांची सेवा करतात . 

अापण त्यांच्याशी गप्पा गोष्टी करत असतो तेंव्हा प्रत्येक स्री पुरुषाच्या डोळ्यात तरळत असतात त्यांच्या लेकी, बहिणी आई आणि कुटुंबिय! चेहर्‍यावर उसन हसू आणि डोळ्यात पाणी! स्री पुरुषांच्या वसतीगृहातल्या एकेकांच्या कथा काळजाला घर पाडतात . परिसर दाखवताना दूरवर अधिक्षकांनी परिसरातील एका पत्र्याच्या शेडकडे बोट दाखवत म्हटलं 'ती तिकडू दिसतेय न ती जागा पेशंटची काशी ! मुक्तीधाम! त्यांच्या देहाची राखही याच मातीत मिसळते.  झाडाझाडात रुजून इथेच मुक्ती साधते.
एकदा इथे आलेल्याला नाती उरत नाहीत.

घर रहात नाही! आवड नाही! निवड नाही! बाहेरचा वारा लागतो तो फक्त काही अन्य आजारपण कधी आलच आणि इथे राहून बर होण्यातलं नसेल तर रुग्णांना परळच्या के.ई.एम रुग्णांलयात हलवल जात इलाजासाठी तेंव्हाच! मग पुन्हा इथल्या बदिस्त कोठडीत.

ल्रेप्रसीचा हवेतून फैलाव होतो. स्पर्शातून नाही. आणि माणसाची प्रतिकारशक्ती प्रमाणाबाहेर खालावली की एखाद्याच्या शरीरात शिरलेले रोगाचे जंतू हल्ला चढवतात, व्यक्तीला रोगाची लागण झाली, वेळेत लक्षात नाही आलं, रोग्याने बहिष्कृत जीवन जगायच्या भयाने रोग लपवला, नसा नष्ट होऊ लागल्या की शरिरात चेहर्‍यात हातापायात व्यंग आल की अशी व्यक्ती कुटूंबाला पारखी होते. आणि रोगाजंतूंची वाहक झालेल्या अवस्थेत मग लेप्रसी होमचा पर्यायच त्याच अखेरपर्यत निवासस्थान बनत. 

या रोगावर प्रतीबंधाचा उपाय कितीही संशोधन झाली आहेत तरी सापडत नाहीये. देव करो आणि इतर रोगांवर जसे प्रतिबंधात्मक इलाज सापडलेत, लसीकरण होतय तस या रोगावर पण होवो. कोणाला घरादाराला कायमच पारख होण्याची वेळ न येवो आणि जगभरातली अशी मुक्तीधाम आनंदवन कायमची बंद होवो.

बाबा आमटेंची देखील हीच ईच्छा होती की एक दिवस असा येवो आनंदवनाची गरजच न उरो. आमटे कुटूंबांच, शिवाजीराव सावत यांच कार्य वंदनिय महान आहेच! पण या रोगावरची प्रतिबंधात्मक लस शोधण्यात शात्रज्ञांना यश येईल तो दिवस मानवी इतिहासात क्रांतीकारी असेल.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News