‘सुपर ३०’चा ‘नालंदा’ प्रयोग फसला

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 21 June 2019

‘काबिल’ चित्रपटानंतर हृतिक रोशन ‘सुपर ३०’ चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर लाँचचा कार्यक्रम फसला.

‘काबिल’ चित्रपटानंतर हृतिक रोशन ‘सुपर ३०’ चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच प्रदर्शित होणारा हा चित्रपट काही कारणास्तव रखडला.

इतकंच नव्हे; तर या चित्रपटाचा ट्रेलर लाँचचा कार्यक्रमही फसला. ‘सुपर ३०’चा ट्रेलर लाँच बिहारमधील नालंदा विद्यापीठामधील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत करण्यात येणार होता. त्याद्वारे या चित्रपटाकडे साऱ्यांचे लक्ष वेधून घ्यायचे होते.

आता चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान या चित्रपटाची टीम नालंदा विद्यापीठाला भेट देणार आहे. गणितज्ञ आनंदकुमार यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.  
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News