वायर बांधण्यासाठी चक्क भगव्या ध्वजाचा वापर 

धिरज किरण निचिते
Saturday, 20 July 2019

शहापूर :  भगवा ध्वज हा भारत देशाचा एक ऐतिहासिक व सांस्कृतिक ध्वज आहे. तसेच हा ध्वज मान, मर्यादा, त्याग, बलिदान, शुद्धता आणि शौर्यचं प्रतीक आहे. हिंदुचं शाश्वत आणि सर्वमान्य असं प्रतीक म्हणजे भगवा ध्वज. हजारो वर्षांपासून अनेक भारतीय राजे-सरदारांनी हा पवित्र ध्वज घेऊन देशाची सुरक्षा केली कितीतरी लोकांनी ह्या पवित्र भगव्या ध्वजासाठी प्राण त्यागले. मात्र शहापूर तालुक्यातील खातीवली गावात शिवसेना शाखेवर चक्क एक वायर बांधण्यासाठी भगव्या ध्वजाचा वापर केला आहे. हा त्या भगव्या ध्वजाचा अपमान आहे आणि तो कदापिही सहन केला जाणार नाही.

शहापूर :  भगवा ध्वज हा भारत देशाचा एक ऐतिहासिक व सांस्कृतिक ध्वज आहे. तसेच हा ध्वज मान, मर्यादा, त्याग, बलिदान, शुद्धता आणि शौर्यचं प्रतीक आहे. हिंदुचं शाश्वत आणि सर्वमान्य असं प्रतीक म्हणजे भगवा ध्वज. हजारो वर्षांपासून अनेक भारतीय राजे-सरदारांनी हा पवित्र ध्वज घेऊन देशाची सुरक्षा केली कितीतरी लोकांनी ह्या पवित्र भगव्या ध्वजासाठी प्राण त्यागले. मात्र शहापूर तालुक्यातील खातीवली गावात शिवसेना शाखेवर चक्क एक वायर बांधण्यासाठी भगव्या ध्वजाचा वापर केला आहे. हा त्या भगव्या ध्वजाचा अपमान आहे आणि तो कदापिही सहन केला जाणार नाही. त्याबद्दल जबाबदारी स्वीकारून सबंध हिंदू समाजाची आणि देशाची माफी मागावी अन्यथा देश तुम्हाला कधी माफ करणार नाही. अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. 

सर्व मंदिरात हाच भगवा ध्वज झळकत असतो. छत्रपती शिवाजी महाराजांपासून तर महाभारतातील अर्जुन रामायणातील प्रभू राम यांच्या रथांवर सुद्धा हाच पवित्र भगवा ध्वज फडकत असायचा. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितल्या प्रमाणे भगवा रंग म्हणजे उगवत्या सूर्याचा रंग तसेच अग्नी-ज्वाला चा रंग आणि हाच भगवा ध्वज पराक्रम व ज्ञानाच प्रतीक मानलं जातं.  

आर्यांच्या काळापासून भगवा हा आपला राष्ट्रीय ध्वज आहे. १५ ऑगस्ट  १९४७ पर्यंत आपला राष्ट्रीय ध्वज भगवा होता. आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रात शिवसेना पक्ष स्थापन केला १९६६ ला तेव्हापासून त्यांचा कोणताही अधिकृत ध्वज नाही. त्यांनी शिवसेना ही हिंदुत्ववादी संघटना म्हणून भगवा हाच आमचा ध्वज असा पवित्रा घेतला. मात्र आज त्यांच्याच शाखेवर हा प्रकार पहायला मिळणं म्हणजे आश्चर्यच म्हणावं लागेल. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News