‘तारा फ्रॉम सातारा’ या मालिकेत उर्वशी परदेसी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 6 August 2019
  • उपेंद्र लिमये यांच्या मुलीची भूमिका साकारणार
  • उपेंद्र लिमये उर्वशीला तिच्या वडिलांसारखे वाटतात.​

भारतात नृत्य आणि संगीतासारख्या शास्त्रीय कला प्रकारांचा पूर्वापार चालत आलेला वारसा आहे आणि भारतीयांना हे कला प्रकार शिकून ते सादर करण्याचा नेहमीच अभिमान वाटतो.

‘तारा फ्रॉम सातारा’ या मालिकेत, स्वतः प्रशिक्षित कथक नृत्यांगना असलेली उर्वशी परदेसी ही राष्ट्रीय पुरस्कारविजेते अभिनेता उपेंद्र लिमये यांच्या मुलीची भूमिका साकारणार आहे. ही मालिका साताऱ्यामध्ये नृत्याचे क्‍लास चालवणाऱ्या एका कथक नृत्य शिक्षकाची आणि राधिका व तारा या त्याच्या दोन मुलींबरोबर असलेल्या त्याच्या नात्याची कहाणी आहे.

उपेंद्र लिमये उर्वशीला तिच्या वडिलांसारखे वाटतात. त्यामुळे मालिकेचे चित्रीकरण जसजसे पुढे जात आहे तसतसे तिचे त्यांच्याबरोबरचे नाते घट्ट होताना दिसत आहे. उर्वशी उपेंद्र यांची स्तुती करते; कारण ते तिची स्वतःच्या मुलीसारखी काळजी घेतात आणि अभिनय आणि नृत्याच्या बाबतीत तिला चांगली साथ देत आहेत. तिचे वडील स्वतः एक नर्तक आणि तिचे नृत्य शिक्षकसुद्धा आहेत आणि या मालिकेतही तसेच असणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News