यूपीएससीत टॉप राहूनही व्हावं लागलं ट्रोल; लोकांच्या मानसिकतेचा कहरच

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 16 July 2019

युपीएससी 2014 मध्ये टॉप राहिलेल्या इरा सिंघल या अनेक तरुण-तरुणींसाठी प्रेरणादायी ठरल्या आहेत. खऱ्या संघर्षाच्या पायऱ्या चढून यशाचं शिखर गाठलेल्या इरा यांना काही लोकांच्या खालच्या थराच्या मानसिकतेमुळे ट्रोल व्हावं लागतं, हे खरं दुर्दव्य आहे.

UPSC Topper Ira Singha नवी दिल्ली :  युपीएससी 2014 मध्ये टॉप राहिलेल्या इरा सिंघल या अनेक तरुण-तरुणींसाठी प्रेरणादायी ठरल्या आहेत. खऱ्या संघर्षाच्या पायऱ्या चढून यशाचं शिखर गाठलेल्या इरा यांना काही लोकांच्या खालच्या थराच्या मानसिकतेमुळे ट्रोल व्हावं लागतं, हे खरं दुर्दव्य आहे.

इरा सिंघल या 2014 मधल्या यूपीएससी परिक्षेतल्या टॉप कॅंडिडेट आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी फेसबूकवर दिव्यांगपणाची एक पोस्ट शेअर केली. त्यानंतर काही लोकांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरूवात केली. त्यावर इरा यांनी दिलेली प्रतिक्रियाही तेवढीच आक्रमक होती...

काय म्हणाल्या इरा सिंघल...
या जगात खूप दयाळू माणसं राहतात, त्यांना असं वाटतं की दिव्यांग व्यक्तींना समाजामध्ये काहीचं संघर्ष करावा लागत नाही, मात्र त्यांनाच खरा संघर्ष करावा लागतो, तो म्हणजे लोकांच्या संकोचित मनोवृत्तीसोबत. काही दिवसांपूर्वी मी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. त्यावर सायबर बुलिंगचा चेहरा समोर आला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Attending Nari Shakti Utsav as Chief Guest

A post shared by Ira Singhal (@singhal.ira) on

इरा सिंघल यांचा प्रवास...
इरा सिंघल यांनी 2014 मधल्या लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत विकलांग असूनसुध्दा सगळ्यात टॉप रॅंक मिळवली होती. त्या याआधी 2010 मध्ये लोकसेवा आयोगाची पहिल्यांदा 815 वी रॅंक मिळवत पास झाल्या होत्या, मात्र त्यावेळी विकलांग असल्याने त्यांना कोणतीच पोस्टींग मिळाली नव्हती. 2014मध्ये मात्र लोकसेवा परिक्षेमध्ये पास होत त्यांनी आपली जिद्द कायम ठेवली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News