युपीएससी मुख्य परीक्षा : निबंधलेखनाचा असा करा सराव

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 23 August 2019

सामाजिक समस्या, महिला आणि बालकांचे प्रश्‍न, महिला सबलीकरण, शिक्षण आरोग्य, कायदा-सुव्यवस्था, राज्यघटना, राजकारण, आर्थिक आणि वैज्ञानिक घडामोडी, क्रीडा आदी क्षेत्रांबाबत वर्तमानपत्रांत येणाऱ्या सर्व बातम्यांकडे आपले बारकाईने लक्ष असायला हवे.

निबंधलेखन ही एक कला आहे आणि ती एक-दोन दिवसांत नव्हे, तर प्रदीर्घ कालावधीत विकसित झालेली असते. आपण वाचलेली पुस्तके, चरित्र ग्रंथ, पाहिलेल्या विविध गोष्टी, ऐकलेली विविध संभाषणे आणि भाषणे, आपल्या सभोवताली घडणाऱ्या विविध घडामोडी, विविध समस्या यांवर केलेले चिंतन व मनन यातून आपल्या विचारांना एक सकारात्मक आणि तर्कशुद्ध बैठक निर्माण होते आणि त्यातूनच निबंधलेखनासाठी एक सामग्रीसुद्धा आकार घेऊ लागते.

त्यामुळे आपण स्वत:ला अवांतर वाचन करण्याची एक सवय जडवून घ्यावी. वर्तमानपत्रांतून येणाऱ्या बातम्यांकडे आपण प्रशासकाच्या भूमिकेतून पाहणे आवश्‍यक आहे. किंबहुना आपण तशी सवयच जडवून घ्यायला हवी. त्यातही सामाजिक समस्या, महिला आणि बालकांचे प्रश्‍न, महिला सबलीकरण, शिक्षण आरोग्य, कायदा-सुव्यवस्था, राज्यघटना, राजकारण, आर्थिक आणि वैज्ञानिक घडामोडी, क्रीडा आदी क्षेत्रांबाबत वर्तमानपत्रांत येणाऱ्या सर्व बातम्यांकडे आपले बारकाईने लक्ष असायला हवे.

यामुळे निबंधलेखनासाठी आवश्‍यक असणारी प्रगल्भ विचारसरणी आपल्यात आपोआप विकसित होण्यास मदत होईल. निबंधलेखन करणे हे एखाद्या वक्‍त्याने एखाद्या विषयावर आपल्या सर्वसामान्य श्रोत्यांच्या बरोबर केलेली मुक्त आणि सकारात्मक चर्चा असते. निबंध आणि प्रबंध यात मोठा फरक असतो, हे आपण लक्षात घेणे आवश्‍यक आहे. प्रबंधात प्रत्येक बाबींवर तज्ज्ञ व्यक्तीने आपले विचार सखोल मांडलेले असतात आणि त्यात सखोल अभ्यासाचा अंतर्भाव असतो.

सर्वसामान्य माणसाला प्रबंध हा कंटाळवाणा वाटू शकतो. कारण सर्वसामान्य माणसाला केवळ त्याच्याशी संबंधित समस्यांशी देणे-घेणे असते. म्हणून आपला निबंध हा प्रबंध होणार नाही, याची काळजी घेणे आवश्‍यक असते. म्हणूनच निबंध लिहिताना आपले विचार हे कोणत्याही सर्वसामान्य वाचकाला सहजसुलभ समजणारे असतील याची काळजी घेणे गरजेचे असते. त्यात कोणतीही अशी चर्चा असू नये, की जी केवळ तज्ज्ञांनाच कळेल.

आपला निबंध कोणत्याही सर्वसामान्य वाचकाने वाचला तरी तो सहजसुलभ त्याला समजेल अशा पद्धतीने लिहिणे आवश्‍यक असते. त्यामुळे निबंधात एकदम सविस्तर, काटेकोर आणि तज्ज्ञ विचार मांडणे टाळून साध्या सोप्या भाषेत लिहिला आणि सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांची उदाहरणे देता आली तर उत्तमच. म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, निबंधात व्याख्या, आलेख, आकृत्या, प्रवाही तक्ते, संक्षिप्त रूपे इत्यादी गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात.

कारण या सर्व बाबी आपण प्रबंधात लिहीत असतो. निबंधात मुद्दे हे क्रमांक देऊन नमूद न करता ते परिच्छेदाच्या स्वरूपात लिहिणे आवष्यक असते. निबधांसाठी आपल्याला शब्दमर्यादा देण्यात आलेली असते. त्यामुळे आपल्याला उपलब्ध असलेल्या शब्दमर्यादेतच दिलेल्या विषयावर आपण निबंध लिहिणे आवश्‍यक असते. अर्थातच आपण लिहीत असणाऱ्या निबंधात अनावश्‍यक श्‍ब्द येणार नाहीत, याची काळजी घेणे आवश्‍यक असते. अन्यथा उपलब्ध असणारी जागा कमी पडून आपल्याला जे महत्त्वाचे मुद्दे लिहावयाचे असतील ते लिहिणे राहिल्यामुळे गुण कमी येतील.

शिवाय वेळेचा अपव्यय झाल्यामुळे इतर महत्त्वाचे मुद्दे लिहिता आले असते आणि त्यामुळे एकूणच गुणात वाढ झाली असती. तो तोटाही सहन करावा लागतो आणि अनावश्‍यक लिहिलेल्या मुद्द्यांना गुण तर प्राप्त होतच नाहीत.
निबंधात आपण कोणत्याही धर्म, पंथ, जात, भाषा, प्रदेश, संस्कृती किंवा समाज आदींविरुद्ध कोणतीही टीका किंवा टिप्पणी करू नये किंबहुना आपल्या लिखाणातून आपण या वर उल्लेख केलेल्या कोणत्याही घटकाचे सदस्य आहोत, याची प्रचीतीही देऊ नये.

असे लिखाण करणे म्हणजे आपण पूर्वग्रहदूषित आहोत, असा संदेश आपल्या नकळत आपण परीक्षकाला देऊन टाकल्यासारखे होईल. त्याचबरोबर आपले लिखाण हे कोणत्याही लिंगभेद निरपेक्ष असायला हवे. त्यात महिलांना सन्मान करणारे, निसर्गातील प्राणिमात्रांबद्दल सहानुभूती दर्शविणारे आणि पर्यावरणरक्षण आणि संवर्धनास अनुकूलता दर्शविणारे असावे. 

विद्यार्थी मित्रांनो, निबंधलेखन ही एक फार मोठी कला आहे आणि ती आत्मसात करणे, या कलेवर प्रभुत्व मिळविणे ही एक निरंतर साधना असते. आपण ती साधना सुरू केली असेलच यात कोणतीही शंका नाही. निबंधलेखन आणि अभ्यासाच्या इतर घटकांची आपण उत्तम तयारी करावी, आपण यशाच्या परमोच्च शिखरावर विराजमान व्हावे, 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News