यूपीएससीचे वेळापत्रक जाहीर; २०२० मध्ये  'या' दिवशी होणार परीक्षा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 4 June 2019

केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) ने २०२० सालच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. २०२० मध्ये यूपीएससी नागरी सेवा परीक्षेची पूर्व परीक्षा ३१ मे रोजी होणार आहे. यूपीएससी परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी upsc.gov.in या अधिकृत वेबसाइटवर परीक्षेचं संपूर्ण वेळापत्रक पाहू शकतात. 

पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) ने २०२० सालच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. २०२० मध्ये यूपीएससी नागरी सेवा परीक्षेची पूर्व परीक्षा ३१ मे रोजी होणार आहे. यूपीएससी परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी upsc.gov.in या अधिकृत वेबसाइटवर परीक्षेचं संपूर्ण वेळापत्रक पाहू शकतात. यूपीएससीच्या नागरी सेवा परीक्षेची पूर्व परीक्षा यावर्षी २ जून २०१९ रोजी आयोजित करण्यात आली होती. 

नागरी सेवा परीक्षेसाठी नोंदणी प्रकिया ही १२ फेब्रुवारी २०२० मध्ये सुरू होणार आहे. ही नोंदणी प्रकिया ३ मार्च २०२० पर्यंत सुरु असणार आहे. नागरी सेवा मुख्य परीक्षा ही १८ सप्टेंबर २०२० रोजी आयोजित करण्यात आली आहे. तर इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस (IFS)ची पूर्व परीक्षा ही ३१ मे २०२० रोजी आयोजित करण्यात येणार आहे. 

आयएफएसची नोंदणी प्रकिया देखील १२ फेब्रुवारी २०२० मध्ये सुरू होणार आहे. ही नोंदणी प्रक्रिया देखील ३ मार्च २०२० पर्यंत सुरु असणार आहे. आयएफएसची मुख्य परीक्षा ही २२ नोव्हेंबर २०२० मध्ये होणार आहे. यूपीएससीच्या नागरी सेवा परीक्षेच्या अंतर्गत आयएएस, आयपीएस, आयएफएश आणि 'ग्रुप ए'मधील पदं भरली जातात. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News