उपेंद्र म्हणजे प्रेरणादायी अभिनेता

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 2 July 2019

काही व्यक्तिमत्त्व आपल्याला आवडतात आणि जर त्यांच्याबरोबर आपल्याला काम करण्याची संधी मिळाली तर तो क्षण स्वप्न सत्यात उतरण्याचा असतो. असेच काहीसे

मुंबई : काही व्यक्तिमत्त्व आपल्याला आवडतात आणि जर त्यांच्याबरोबर आपल्याला काम करण्याची संधी मिळाली तर तो क्षण स्वप्न सत्यात उतरण्याचा असतो. असेच काहीसे ॲडफिल्म निर्माता आणि बॉलिवूडमधील गजराज राव याच्या बाबतीत घडले. ‘तारा फ्रॉम सातारा’ या मालिकेत रोशनी वालिया आणि अभिनेता उपेंद्र लिमये यांच्यासह इतर कलाकारांचा समावेश आहे. ‘जोगवा’ या मराठी चित्रपटातील भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या उपेंद्रचा अनेक राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटांमध्येही सहभाग होता. अनेक वर्षांपासून अभिनेता म्हणून उपेंद्रची प्रशंसा करणारा गजराज राव मालिकेचा प्रोमो दिग्दर्शित करताना त्याला पाहून भारावून गेला.

गजराज म्हणाला, ‘‘उपेंद्र एक प्रेरणादायी अभिनेता आहे आणि त्याचे व्यक्तिमत्त्व अतिशय सकारात्मक आहे. कथ्थक नर्तकाच्या भूमिकेसाठी त्याने केलेले कठोर परिश्रम आणि प्रयत्न प्रशंसनीय आहेत. त्याच्यासारख्या अभिनेत्याबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली, हे मी माझे भाग्यच समजतो. तो आजूबाजूच्या सगळ्यांनाही सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी प्रेरणा देतो आणि माझ्या मते ही त्याच्या व्यक्तिमत्त्वाची सर्वोत्तम बाजू आहे.’’

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News