किती युगांचे अनोळखीपण...

स्पृहा
Thursday, 27 June 2019

किती युगांचे अनोळखीपण
साचुन आले डोळ्यांत
हलके हलके धुके ओसरे

किती युगांचे अनोळखीपण
साचुन आले डोळ्यांत
हलके हलके धुके ओसरे
ऊन बोचरे अंगणात...

निळाशार चिमुकला किनारा
मनास झाला भास उगा
गर्द राइची खूणही नसे
उदासवाण्या शहरात...

मुठीत होता बंद शिंपला
त्यातच होते खुशाल मी,
उगा गुंतला जीव बिचारा
आतिल खोट्या मोत्यात..

लाख दिव्यांच्या लाख सावल्या
झगमगती बेहोश नशा,
कुठे हरवले माझे घरकुल
एकच एका प्रहरात..!!

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News