वडाळ्यात ब्रेन ट्युमर झालेल्या तरुणावर 'ही' झाली अजब शस्त्रक्रिया

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 5 June 2019

वडाळा - ब्रेन ट्युमर झालेल्या रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया करून डॉक्‍टरांनी त्याला नवसंजीवनी दिल्याचे अनेक किस्से आपण ऐकले आहेत. मात्र, बेशुद्धावस्थेतील तरुणाच्या मेंदूवर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून, त्याचा ट्युमर काढण्यात परळच्या ग्लोबल रुग्णालयातील डॉक्‍टरांना यश आले आहे. अशी शस्त्रक्रिया प्रथमच केल्याचा दावा रुग्णालयाच्या डॉक्‍टरांनी एका पत्रकार परिषदेत केला. रुग्ण व त्याचे नातेवाईकही त्या वेळी उपस्थित होते.

मुलुंडमध्ये राहणारा गणेश भोर (वय २९) सांताक्रूझमधील एका खासगी कंपनीत तंत्रज्ञ म्हणून कामाला आहे. अनेक दिवसांपासूनच्या डोकेदुखीमुळे त्याला दैनंदिन कामे करणे अवघड झाले होते. २२ मार्चला तो चक्कर येऊन जमिनीवर कोसळला. त्याला तातडीने ग्लोबल रुग्णालयात दाखल केल्यावर बेशुद्धावस्थेतच त्याच्या सर्व चाचण्या करण्यात आल्या. त्या आधारावर त्याच्यावर तत्काळ शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय डॉक्‍टरांनी घेतला. त्यानुसार न्यूरोसर्जन डॉ. नितीन डांगे यांच्या टीमने गणेशवर शस्त्रक्रिया सुरू केली.

बेशुद्धावस्थेतील गणेशला शस्त्रक्रियेदरम्यान अर्धांगवायूचा झटका येण्याचा किंवा कोमात जाण्याचा धोका होता. त्यानुसार डॉक्‍टरांनी अतिशय काळजीपूर्वक दोन तास गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून ब्रेन ट्युमर बाहेर काढला. चौथ्या दिवशीच गणेशला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. बेशुद्धावस्थेत मेंदूवर शस्त्रक्रिया करून ट्युमर बाहेर काढण्याची पहिलीच शस्त्रक्रिया असल्याचा दावा डॉ. डांगे यांनी केला. रुग्णालयाच्या सभागृहात घेण्यात आलेल्या परिषदेत त्यांनी त्याबाबतची माहिती दिली. गणेश भोर आणि त्याची बहीणही पत्रकार परिषदेला उपस्थित होते. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News