निर्मल स्कूलमध्ये सरप्राईज हाऊस आणि थिंक अॅंड टेल फलकाचे अनावरण

डॉ. राहुल तौर
Wednesday, 3 July 2019

कल्याण - शाळा ही समाजाची छोटी प्रतिकृती असते. शाळेत जे अनुभव मिळतात ते अनुभव कायम संस्मरणीय ठरतात. मुलं म्हणजे कुतूहलाचं दुसरं नाव. त्यांना अनेक प्रश्न पडलेले असतात. वेगवेगळ्या वस्तूंविषयी त्यांच्या मनात एक प्रकारची शंका कायमची असते. 

मुलांच्या या कुतुहलाला योग्य दिशा देण्यासाठी कल्याण, गोवेली येथील निर्मल स्कूलमध्ये सरप्राईज हाऊस आणि थिंक अॅंड टेल या फलकाचे अनावरण करण्यात आले. सरप्राईज हाऊसमध्ये दर आठवड्याला दोनदा नवीन वस्तू ठेऊन त्याची माहिती मुलांना दिली जाणार आहे तर थिंक अॅंड टेल या फलकावर मुलांच्या बुद्धीला चालना देणारे कोड दिले जाणार आहेत ज्यातून मुलांच्या बुद्धीचा विकास होण्यास मदत होईल. 

सदर उपक्रमाची सूत्र सौ. सरिता ताडे मॅडम, संगीत शिक्षक श्री केमारे सर व  शाळेतल्या सर्व शिक्षकांकडे असून त्यांनी पाहिल्या दिवशी आणलेलं सरप्राईज स्तूत्य होतं. सरप्राईज हाऊस आणि फलकाचं उदघाटन प्राध्यापिका भाग्यश्री पवार मॅडम व शाळेचे मुख्यध्यापक श्री जाधव सर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळेचा मुलांचा प्रतिसाद अवर्णनीय होता.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News