विविध मागण्यांसाठी विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 11 June 2019
  • अशी माहिती महासंघाचे राज्य उपाध्यक्ष डॉ. कैलास पाथ्रीकर यांनी दिली.
  •  संघटनेचे अध्यक्ष पर्वत कासुरे, डॉ. पाथ्रीकर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.
  • महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघाची पुणे येथे बैठक घेण्यात आली.

औरंगाबाद : राज्यातील अकृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सोमवार पासून आंदोलन सुरु करण्यात आले आहे. अशी माहिती महासंघाचे राज्य उपाध्यक्ष डॉ. कैलास पाथ्रीकर यांनी दिली. संघटनेचे अध्यक्ष पर्वत कासुरे, डॉ. पाथ्रीकर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. 

महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघाची पुणे येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीस अध्यक्ष रमेश शिंदे, महासचिव मिलिंद भोसले, उपाध्यक्ष डॉ. कैलास पाथ्रीकर, कार्याध्यक्ष अजय देशमुख, कोषाध्यक्ष जगन्नाथ दळवी, सचिव शिवराम लुटे आदींची उपस्थिती होती. शासन स्तरावर अकृषी विद्यापीठीय शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणे, सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेबाबत निर्णय पुर्ववत करणे, तसेच अन्य प्रलंबित प्रश्नासंदर्भात आंदोलनात्मक भूमिका घेण्यात आली आहे. 

दहा जून ते 12 जूनपर्यंत सर्व अकृषी विद्यापीठातील शिक्षकेत्तर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम करणे. 13 जूनपासून सर्व कर्मचाऱ्यांनी कार्यालयात काळ्या फिती लावून किंवा अकृषी विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीसमोर निदर्शने करणे. अकृषी विद्यापीठातील शिक्षकेत्तर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विभागीय सहसंचालक उच्च शिक्षण, औरंगाबाद आणि उच्च शिक्षण संचालक, पुणे यांच्या कार्यालयावर मोर्चा काढणे. तसेच 29 जुनला लाक्षणिक संप आयोजित करणे. तसेच महासंघाच्या निर्देशानुसार जुलै महिन्यात कोणत्याही प्रसंगी बेमुदत संप पुकारण्यात येईल. असे ठराव घेण्यात आले आहेत. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News