बेरोजगारांचे नेते चांगदेव गिते यांनी घेतली श्री. प्रकाश आंबेडकरांची भेट

चांगदेव गिते
Thursday, 11 July 2019

एक सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा असलेले श्री.गिते हे प्रस्थापित लोकांविरुद्ध शड्डू ठोकून उभा राहणार असल्याची जोरदार चर्चा राज्यभर होत आहे.

आपली डिग्री विकायला काढुन राज्यभर खळबळ माजवणारे व सुशिक्षित बेरोजगार, शेतकरी, ऊसतोड कामगार यांच्या प्रश्नांवर वेळोवेळी आवाज उठवणारे तरुण नेते चांगदेव गिते यांनी वंचित बहुजन आघाडी चे सर्वेसर्वा श्री. प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली.

तरुण, उच्चशिक्षित, अभ्यासु अन लढवैय्या असलेले श्री. गिते हे वंचित बहुजन आघाडी कडुन बीड जिल्ह्यातील आष्टी/पाटोदा/ शिरूर मतदार संघात इच्छुक असल्याचे समजत आहे. गिते हे आक्रमक असून आजपर्यंत त्यांनी अनेक वेळा, मुखमंत्री, मंत्री , अधिकारी यांना वेळोवेळी जनतेच्या कामासाठी जाब विचारले आहेत.

शिवाय अनेक प्रश्नावर त्यांनी आंदोलन ही केले आहेत. एक सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा असलेले श्री.गिते हे प्रस्थापित लोकांविरुद्ध शड्डू ठोकून उभा राहणार असल्याची जोरदार चर्चा राज्यभर होत आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News