या खास टूलमुळे एडिट केलेला फोटो समजणार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 17 June 2019
  • सध्याच्या काळात एडिट करण्यात आलेले फेक व्हिज्युअल आणि फोटो अनेकदा वायरल होत आहेत.
  • हे फोटो खरे की खोटे हे ठरवणे हे अशक्य असते.
  • मात्र, या नव्या टूलमुळे फेक, एडिटेड फोटो ओळखण्याची अडचण दूर होणार आहे.

मुंबई : सध्या फोटो काढण्यासोबतच फोटो एडिट करणाऱ्यांची देखील क्रेझ आहे. यासाठी अनेक सॉफ्टवेअर आणि ऍप्स वापरण्यात येतात. त्यामुळे एखादा फोटो खरा आहे की, एडिट करण्यात आला आहे, हे ओळखणं कठीण होते. मात्र आता हे अगदी सहज ओळखता येणार आहे. 

ऍडोबने एक नवं टूल तयार केलं आहे. यामुळे एखादा एडिट केलेला फोटो ओळखणे शक्य होणार आहे. युनिर्व्हसिटी ऑफ कॅलिफोर्निया, बर्कलेतील संशोधकांच्या सहकार्याने ऍडोबने हे नवे टूल तयार केले आहे. आजच्या दिवसांत नवनवीन एडिटिंग सॉफ्टवेअरमुळे खरा कोणता आणि एडिट केलेला कोणता फोटो ओळखणे अशक्य होते. 

सध्याच्या काळात एडिट करण्यात आलेले फेक व्हिज्युअल आणि फोटो अनेकदा वायरल होत आहेत. हे फोटो खरे की खोटे हे ठरवणे हे अशक्य असते. मात्र, या नव्या टूलमुळे फेक, एडिटेड फोटो ओळखण्याची अडचण दूर होणार आहे. ऍडोबचे नवे संशोधन हे फोटो, व्हिडिओ, ऑडिओ आदीमध्ये करण्यात आलेल्या छेडछाड, एडिटींग ओळखण्याच्या संशोधनाचा हिस्सा असल्याचे ऍडोबने म्हटले आहे. 

'फेस अवे लिक्विफाय' या फिचरच्या मदतीने फोटोमध्ये करण्यात आलेले बदल पाहता येणे शक्य आहे. या फिचरचा वापर नेहमी चेहऱ्याचा आकार, ओठ, डोळे व्यवस्थित करण्यासाठी करण्यात येतो. सामान्यपणे डोळ्यांनी पाहिल्यास १००पैकी ५३ वेळा एडिटेड फोटो ओळखता येतो. तर, या टूलच्या मदतीने १०० पैकी ९९ एडिटेड फोटो ओळखता येतात. 

या टूलने चेहऱ्यांमध्ये करण्यात आलेले बदल ओळखता आले. ऍडोबचे रिसर्च प्रमुख गाविन मिलर यांनी सांगितले की, या टूलमुळे एडिटेड फोटो आणि खरा फोटो ओळखता येईल. अनेक फोटो दिशाभूल करण्यासाठी, सुंदर दिसण्यासाठी एडिट केले जातात. या टूलच्या मदतीने दिशाभूल टाळता येईल, असा दावाही त्यांनी केला. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News