अनधिकृत शाळेतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला अडचणी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 27 June 2019

आनंदवन शाळेच्या चालकांवर अनधिकृत शाळा चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर शाळेतील विद्यार्थाना पुढील प्रवेशासाठी अडचणीचा सामना करावा लागत आहे. इतर शाळाना विद्यार्थ्यांचे मूळ स्थलांतर प्रमाणपत्राशिवाय प्रवेश पूर्ण करता येत नसल्याने अद्यापही १६४ विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न निर्माण झाल. शिक्षण विभागाने उशिरा कारवाई केल्याने मोठ्या अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान, बुधवारी पालक दिवसभर गटशिक्षणाधिकारी कार्यालयात ठाण मांडून होते. 

पाथरी येथील आनंदवन आंतरराष्ट्रीय शाळा दोन वर्षांपासून अनधिकृत सुरू असताना पाथरीच्या शिक्षण विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने या प्रकरणात जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे तक्रारी दाखल झाल्या होत्या. या प्रकरणी चौकशी समिती नेमण्याचे येऊन सविस्तर आवाहल दाखल झाला होता. चौकशीत ही शाळा अनधिकृत ठरली, २९ जानेवारी राेजी शिक्षण विभागाने या प्रकरणात पोलिस कारवाईचे आदेश स्थानिक शिक्षण विभागाला दिले होते. मात्र, पाथरीचे गटशिक्षणाधिकारी विश्वास खोगरे यांनी शाळेचे संस्थाचालक डॉ. सलीम अमीन शेख यांच्या विरुद्ध १६ जून रोजी पाथरी पोलिसात फिर्याद दिली आणि गुन्हा दाखल झाला. या शाळेतील १६४ विद्यार्थ्यांचे इतर शाळेत प्रवेश करण्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण होत असून पालक अडचणीत सापडले आहेत.

१७ जूनपासून शैक्षणिक सत्र सुरू झाले आहे. अजून या विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले नाहीत. स्कुल पोर्टलवरून १६४ विद्यार्थ्यांचे प्रवेश देण्याबाबत कारवाई सुरू करण्यात आली असली तरी ऑनलाइन प्रक्रियेत प्रवेश देण्यापूर्वी मूळ शाळेचे स्थलांतर प्रमाणपत्र असल्याशिवाय या विद्यार्थ्यांचा प्रवेश निव्वळ प्रवेश अर्जावरून प्रवेश निर्गम मध्ये घेतला जात नाही. पोर्टलवर प्रवेश करता येत नसल्याने अद्याप एकही विद्यार्थ्यांचे इतर शाळेत अधिकृत प्रवेश झाले नाहीत. त्या मुळे पालक अडचणीत सापडले आहेत. बुधवारी दिवसभर अनेक पालक गटशिक्षणाधिकारी कार्यालयात ठाण मांडून होते तर काही शाळेचे मुख्याध्यापक ही विचारणा करत होते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News