आदित्य ठाकरे नाही, तर उध्दव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावे? कार्यकर्त्यांचा आक्रोश

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 12 July 2019

निलम गोऱ्हे आता आदित्य ठाकरे विधीमंडळात दिसतील 
 

सोलापूर : शिवसेनेच्या माध्यमातून राज्यातील सर्वच घटकांचे प्रश्‍न सोडविण्यात शिवसेना आग्रही राहीली आहे. त्यामुळे शिवसेनेला सत्तेत समान वाटा मिळावा ही सर्वांचीच इच्छा असून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, अशी शिवसेना कार्यकर्त्यांची इच्छा आहे. तसेच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी विधीमंडळात यावे, जेणेकरुन त्याचा अन्य आमदारांना निश्‍चितपणे फायदा मिळेल, असे प्रतिपादन शिवसेनेच्या नेत्या तथा विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी सोलापुरात केले. 

आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भाजपचे अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक झाली आहे. त्यानुसार शिवसेनेने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. दरम्यान, शिवसेनेने मला विधानपरिषदेच्या उपसभापतीपदाची संधी दिली असून तब्बल 55 वर्षांनंतर त्या ठिकाणी महिलेला संधी मिळाली आहे. त्या माध्यमातून शेतकरी आत्महत्या कुटुंबातील विधवा महिला, ऊसतोड कामगार, पंढरीला येणाऱ्या वारकऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत, असेही त्या म्हणाल्या.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News