पक्षांतर्गत कलह टाळण्यासाठी उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्रिपद नाकारलं ?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 15 June 2019

मुंबई :  उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्रिपद घेण्यास नकार दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. काल मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या चर्चेत ही माहिती मिळाली आहे.शिवसेनेतील अंतर्गत वाद टाळण्यासाठीच उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्रिपद नाकारलं असल्याची माहिती मिळतेय. 

 मात्र उपमुख्यमंत्रीपद सोडत असल्याने आणखी एखादं मंत्रीपद शिवसेनेला मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये जयदत्त क्षीरसागर यांच्यासह राज्यमंत्री पदासाठी राजेश क्षीरसागर, तानाजी सावंत, उदय सामंत यांची नावं आघाडीवर आहेत. तर दादाजी भुसे आणि संजय राठोड यांचीही नावं चर्चेत आहेत.

ग्रामीण भागात लोकांमधून निवडून आलेल्या आमदारांना डावलून, मागच्या दाराने आलेल्या विधानपरिषद सदस्यांना मंत्रिपद देण्यात येत असल्याने शिवसेना आमदारांमध्ये असंतोष असल्याचं बोललं जातं आहे.मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेला त्यांचा कोटा देण्यात येईल म्हणजेच त्यांचं रिक्त झालेले एक कॅबिनेट मंत्रीपद आणि दुसरं एक राज्यमंत्रिपद किंवा कॅबिनेट पद मिळण्याची शक्यता आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार आहेत आणि त्यामुळे उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News