मराठा आरक्षणाला उद्धव ठाकरेनी मार्ग दाखवला: आमदार अंबादास दावने

संदीप काळे 
Saturday, 21 September 2019

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आमदार अंबादास दावने यांची सकाळ माध्यम समूहाच्या "महाराष्ट्र दौऱ्यात" संदीप काळे यांनी घेतलेली विशेष मुलाखत.
 

वंचितांनी शिवसेना पक्ष का स्विकारावा?
शिवसेना हा सर्वसामान्य जनतेचा पक्ष आहे, महत्त्वाचं म्हणजे तो जात माणनारा नाही. अनेक वंचिताना शिवसेना पक्षानी उमेदवारी दिली होती. तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे वंचित समाजाने शिवसेना पक्ष स्विकारावा.

मराठा आरक्षणात शिवसेनेची काय भूमिका?
मराठा क्रांती मोर्चाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नैतिक पाठिंबा दिला होता. आरक्षण कोणत्या मार्गाने मिळेल यासाठी सरकारला मार्गदर्शन केले.  

मराठवाड्यात शिवसेनेचं महत्त्व कमी होत आहे का?
नाही, गेल्या विधानसभा आणि यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पुर्वीपेक्षा अधिक उमेदवार शिवसेना पक्षाचे निवडून आले होते. त्यामुळे शिवसेनेचे महत्त्व मराठवाड्यात वाढले आहे.    

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News