उदयनराजेंच्या बालेकिल्यातच मतदानाचा टक्का घसरला

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 21 October 2019

सातारा - सातारा लोकसभेची पोटनिवडणूक आणि आठ विधानसभा मतदारसंघांसाठी जिल्ह्यातील दोन हजार 978 मतदान केंद्रांवर मतदान सुरु आहे. सायंकाळी सहापर्यंत मतदान होईल. सातारा लोकसभेसाठी सात तर विधानसभेसाठी 64 उमेदवार रिंगणात आहेत. 

सातारा - सातारा लोकसभेची पोटनिवडणूक आणि आठ विधानसभा मतदारसंघांसाठी जिल्ह्यातील दोन हजार 978 मतदान केंद्रांवर मतदान सुरु आहे. सायंकाळी सहापर्यंत मतदान होईल. सातारा लोकसभेसाठी सात तर विधानसभेसाठी 64 उमेदवार रिंगणात आहेत. 

प्रशासकीय यंत्रणेच्या सूचनेनूसार मतदार प्रथम लोकसभेसाठी व नंतर विधानसभेसाठी मतदान करीत आहेत. जिल्ह्यात सातारा लोकसभा पोटनिवडणुक आणि आठ विधानसभा मतदारसंघात सकाळी अकरापर्यंत दोन लाख 82 हजार 166 असे 11.18 टक्के इतके मतदान झाले आहे. दरम्यान सातारा लोकसभा पोटनिवडणुक आणि सहा विधानसभा मतदारसंघात सकाळी अकरापर्यंत दोन लाख 18 हजार 514 मतदारांनी (11.80 टक्के) इतके मतदान झाले आहे. 

यामध्ये सर्वाधिक कमी सातारा विधानसभा मतदारसंघात 27 हजार 788 इतके तसेच कऱ्हाड दक्षिण येथे 44 हजार 937 इतके सर्वाधिक मतदान झाले आहे. अन्य विधानसभा मतदारसंघात वाई 31 हजार 598, कोरेगाव 46 हजार 737, कऱ्हाड उत्तर 31 हजार 092, पाटण 36 हजार 362 असे मतदान झाले आहे. याव्यतरिक्त फलटण 40 हजार 670 तसेच माण 22982 मतदारांनी असे एकूण 63 हजार 652 मतदारांनी (9.47 टक्के) इतके मतदान केले आहे. 

बहुतांश मतदारसंघात मतदारांनी मतदानासाठी यावेत यासाठी कार्यकर्ते पूढाकार घेऊ लागले आहेत. नेते मंडळी देखील नागरीकांनी मतदानासाठी बाहेर पडावे असे माध्यमांतून आवाहन करीत आहेत. दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रावर व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News