यु मुम्बा विजयपथावर तर जयपूरची घोडदौड कायम

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 17 August 2019

रोहित बलियानने अखेरच्या चढाईत केलेली कमाल यू मुम्बाला प्रो कबड्डीतील आजच्या सामन्यात पाटणा पायरेटस्‌वर ३४-३० असा विजय मिळवणारी ठरली. या विजयामुळे मुंबईचा संघ चार विजयांसह चौथ्या स्थानावर आला आहे.

अहमदाबाद : रोहित बलियानने अखेरच्या चढाईत केलेली कमाल यू मुम्बाला प्रो कबड्डीतील आजच्या सामन्यात पाटणा पायरेटस्‌वर ३४-३० असा विजय मिळवणारी ठरली. या विजयामुळे मुंबईचा संघ चार विजयांसह चौथ्या स्थानावर आला आहे.

मध्यांतरला ९-२१ अशी मोठी आघाडी घेऊनही मुंबई संघाला विजयासाठी अखेरच्या चढाईपर्यंत लढावे लागले. ही चढाई कमालीची नाट्यमय ठरली. रोहित बलियान हा अखेरचा खेळाडू मुंबईकडे होता आणि तो चढाईला गेला तेव्हा ३१-३० असा गुणफलक होता. त्याची पकड झाली असती, तर मुंबईवर लोण पडला असता; परंतु रोहितने तीन गुण मिळवले आणि मुंबईचा विजय साकारला.

रोहितच मुंबईच्या विजयाचा शिल्पकार ठरला त्याने १४ चढायांत नऊ गुणांची कमाई केली; तर संदीप नरवालने चढाई-पकडींत सहा गुण मिळवले. मुंबईकडून आज अतुल आणि अर्जुन यांनीही चढायांमध्ये चमक दाखवली. कर्णधार फझलच्या महत्त्वाच्या क्षणी केलेल्या पकडी मोलाच्या ठरल्या; पण विनाकारण घाई करणाऱ्या सुरिंदर सिंगने मुंबई संघाला अडचणीत आणले होते. 

पाटणाचा सुपरस्टार प्रदीप नरवालने १८ चढायांत सहा गुणच मिळवले. त्याच्या दोन सुपर चॅटल झाल्या.

जयपूरची घोडदौड कायम
यंदाच्या मोसमात फॉर्मत असलेल्या जयपूरने गुजरातचा २२-१९ असा पराभव केला. घरच्या मैदानावरचे चारही सामने गत उपविजेत्या गुजराने गमावले आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News