मौजमजेसाठी तरुणांची अनोखी शक्कल

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 6 July 2019
  • नालासोपाऱ्यात टोळी अटकेत; १२ गुन्हे उघड; गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई
  • केवळ मौजमजा करण्यासाठी वसई, विरार, नालासोपाऱ्यातील मोटरसायकली चोरणाऱ्या टोळीतील तिघांना नालासोपारा पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने अटक केली

नालासोपारा - केवळ मौजमजा करण्यासाठी वसई, विरार, नालासोपाऱ्यातील मोटरसायकली चोरणाऱ्या टोळीतील तिघांना नालासोपारा पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने अटक केली असून त्यांच्यातील एकजण अल्पवयीन आहे.
 
चोरट्यांनी १२ गुन्ह्यांची कबुली दिली असून गुन्ह्यातील विविध कंपनीच्या मोटरसायकलही जप्त करण्यात आल्या आहेत. अमन अरिफ शेख (वय १९, रा. वसई), संदीप वसंत रसाळ (२७, वाडा-खडकोण-मनोर) अशी त्यांची नावे आहेत. त्यांचा एक साथीदार अल्पवयीन आहे.

नालासोपाऱ्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वसंत लब्धे यांनी सहायक पोलिस निरीक्षक राजू नरवडे, पोलिस उपनिरीक्षक विजय शिरसाट, पोलिस हवालदार महेश पागदरे, पोलिस नाईक किशोर धनु, रुस्तुम राठोड, हर्षद चव्हाण यांचे एक स्वतंत्र पथक बनविले. त्यानुसार पथकाने सापळा रचून अमन शेख याला मोटरसायकलसह ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने साथीदारांची माहिती दिली.

टोळीतील अमन शेख हा १६ वर्षांपासून केवळ मौजमजेसाठी चोऱ्या करत आहे, तर दुसरा आरोपी संदीप रसाळ हा त्यांच्या मोटरसायकली वाडा, मोखाडा, जव्हार या परिसरात १० ते १५ हजाराला विकून देत असे. यातूनच हे सराईत गुन्हेगार झाले असून त्यांच्यावर तीन वर्षांपासून चोरीचे गुन्हे दाखल झालेले आहेत.
- वसंत लब्धे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, नालासोपारा  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News