'या' दोन शिवसेना नगरसेविका एकमेकांत भिडल्या; आमदारांच्या कार्यालयाबाहेरच घडला प्रकार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 12 June 2019
  • शिवसेनेच्या दोन नगरसेवकांचा वाद चव्हाट्यावर
  • नगरसेविकांमध्ये पाण्यावरून जोरदार राडा

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील  शिवसेनेच्या दोन नगरसेवकांचा वाद चांगलाच चव्हाट्यावर आला आहे. नगरसेविकांमध्ये पाण्यावरून चांगलाच राडा झाला आहे. या भांडणात नगरसेविका प्रेमा म्हात्रेंनी शिवसेनेच्याच नगरसेविका आशालता बाबर यांच्या कानशिलात लगावली. हा सर्व प्रकार शिवसेना आमदार सुभाष भोईर यांच्या कार्यालयाबाहेरच घडला.  

पाण्यावरून महाराष्ट्रातील अनेक भागात राजकारण तापल्याचे पाहायला मिळत आहे. याचे लोण आता ठाण्यासारख्या शहरी भागातही पोहचले आहे. पाणीप्रश्नावरून शिवसेनेच्या दोन नगरसेविका समोरासमोर आल्याचे पाहायला मिळाले. केडीएमसीच्या शिवसेना नगरसेविका प्रेमा म्हात्रे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार दुसऱ्या तिसऱ्या कुणी नाही, शिवसेना नगरसेविका आशालता बाबर यांनी केली आहे. मानपाडा पोलिस स्टेशनमध्ये या तक्रारीची नोंद झाली आहे. त्यामुळे शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

आशालता बाबर या नांदिवली मिनल पार्क या प्रभागाच्या नगरसेविका आहेत. रवीकिरण सोसायटीच्या पाणीप्रश्नावरुन बाबर आणि म्हात्रे यांच्यात वाद झाला. या सोसायटीला पाणी दिल्यास आपल्या प्रभागात परिणाम होईल म्हणून बाबर आणि म्हात्रे आमने सामने आल्या. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News