एका शिक्षणाचे दोन ध्रुव

लक्ष्मण जगताप
Saturday, 22 June 2019

मला काय बोलावे ते सुचेना.आज अशी हजारो मुले शाळा शिकण्याच्या वयात वेगवेगळ्या ठिकाणी काम करतात . परिस्थिती म्हणा अथवा गरज म्हणून.
 

त्याचा चेहरा काळा सावळा, डोळे बोलके, केस नीटनेटके, अंगातील कपडे मळलेली, पण बोलताना गालावर हास्य, शरीरयष्टी बारीक, हातात फाटक्या कापडाचा तुकडा, मला पाहून तो चपटकन जवळ आला आणि माझी दुचाकी घेऊन तिला वाँश करु लागला तो त्याच्या कामात गुंग झाला.

मी त्याच्या बाजूलाच उभा. तो अगदी मन लावून आपले काम करीत होता नक्कीच त्याची काही तरी अडचण असेल त्या शिवाय तो काम करणार नाही. खूपच लहान दिसत असल्याने मला राहवेना. शाळा शिकण्याच्या वयात हा काम करतोय. या विचाराने मला अस्वस्थ वाटू लागले. त्याच्याशी बोलावे पण सुरुवात कशी करावी हे समजेना.

मग मीच म्हणालो" अरे, तु खूपच मनापासून आणि चांगले  काम करतोय" त्याने माझ्याकडे पाहिले आणि हासून म्हणाला.' मग मी पुढचा प्रश्न विचारला "अरे तु शाळेत जातोस की नाही? " 

तो लवकर बोलेना. गप्प झाला. मी त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव टिपत होतो. मी पुन्हा विचारले तरी तो सांगेना. याला आता बोलते करायचे असे मनाशी ठरविले.

"अरे सांग ना, तु शाळेत जातो का नाही"? त्याने पुन्हा माझ्याकडे पाहून फक्त स्मितहास्य केले आणि म्हणाला "तुम्ही सर हाय का? मी म्हणालो हो. मग तो म्हणाला "मी शाळेत जात नाय." अरे का जात नाहीस"? मी म्हणालो. तो म्हणाला "मी नववीतून शाळा सोडून दिली .

"अरे पण का "? मी म्हणालो.
"माझं शाळेत डोकं चालत नाय आणि वर्गातील पोरं बी चिडवत्यात". तो म्हणाला. मी विचारात पडलो. आता काय बोलावे.

मी म्हणालो " अरे मुले चिडवतात आणि डोकं चालत नाय म्हणून शाळा सोडतात का? अरे डोकं चालत नाही असे म्हणून कसे चालेल. अभ्यास केल्यास शाळा सोडायची वेळ येत नाही. आणि मुले चिडवतात तर सरांना सांगायचे ना.

"तुझ्या पपांचा नंबर दे मी बोलतो त्यांच्याशी".
नको सर "त्यांनीच सांगितले आहे. शाळेत डोकं चालत नाही, तर कामाला जा. म्हणून मी येथे काम करतोय.
मला काय बोलावे ते सुचेना. आज अशी हजारो मुले शाळा शिकण्याच्या वयात वेगवेगळ्या ठिकाणी काम करतात. परिस्थिती म्हणा अथवा गरज म्हणून.

पण याच्या सारख्या अनेक  मुलांचे पुढे भवितव्य काय? या विचाराने थोडा वेळ का होईना माझी मती गुंग झाली.
एकीकडे स्वच्छ आणि नीटनेटक्या गणवेशात हसत खेळत शाळेत जाणारी मुले आणि दुसरीकडे हातात वही पेन धरायच्या वयात कुटुंबाची किंवा स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी  काम करणारी ही कोवळी  मुले...

काय म्हणायचे याला...मला तर काही सुचत नाही ...

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News