तरुणीच्या एका चुकीमुळे शरीराचे दोन तुकडे

अश्लेषा ननवरे
Friday, 5 July 2019

पाऊसामुळे रेल्वेच्या अनेक समस्या निर्मान होतात. रेल्वे अपघाताच्या अनेक बातम्या आपण ऐकत असतो या रेल्वेने आजपर्यंत अनेक जीव घेतले आहेत

पाऊसामुळे रेल्वेच्या अनेक समस्या निर्मान होतात. रेल्वे अपघाताच्या अनेक बातम्या आपण ऐकत असतो या रेल्वेने आजपर्यंत अनेक जीव घेतले आहेत

असाच एक अपघात अश्विनी मडावी या २२ वर्षीय तरुणीचा हैदराबादच्या बेगमपेठ रेल्वे स्टेशनजवळ बुधवारी सकाळी झाला. अश्विनी मडावी ही तरुणी नेहमीप्रमाणे आपल्या नोकरीला जाण्यासाठी निघाली असताना सिताफलमंडी स्थानकातून अश्विनीने ट्रेन पकडली आणि  नेचर क्युर रेल्वे स्थानकात उतरणार तोपर्यंत हा अपघात घडला.  

ती बेगमपेठ रेल्वे स्थानकात पोहोचल्यानंतर अश्विनी दरवाजाजवळ जाऊन उभी राहिली. दरवाजा जवळ खांबाला धरून ती उभी राहिली, दरवाजात उभी असताना तिचा मोबाईल खाली पडला. मोबाईल उचलण्यासाठी ती खाली वाकताच तिचा तोल गेला आणि ती रेल्वेच्या बाहेर फेकली गेली परंतु तिने खांब सोडला नाही त्यामुळे तिचे पाय रेल्वेच्या चाकामध्ये आल्याने तिच्या शरीराचे दोन तुकडे झाले त्या स्तिथीत ती दूर वर फरफटत गेली असे प्रत्यक्ष दर्शकानी सांगितले.  

पोलिसांनद्वारे सांगण्यात  आले की रेल्वे थांबल्यानंतर तिचा फोन आणि  बॅग हे ट्रेन मधेच होता.  पोलिस प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर  तिचा मृतदेह कुटुंबियांकडे सोपवण्यात आला आहे 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News